अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (२९ मे) गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल २०२२चा अंतिम सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकत गुजरातकडे पदार्पणाच्या आयपीएल हंगामात विजेतेपद पटकावण्याची संधी असेल. तर राजस्थानचा संघ तब्बल १४ वर्षांनंतर चषक जिंकेल.
या मोठ्या सामन्यापूर्वी राजस्थानचा मॅच विनर फलंदाज जोस बटलर हा दिवंगत क्रिकेटपटू शेन वॉर्न याच्या आठवणीत भावूक झाला आहे. बटलरचा वॉर्नच्या आठवणीत रडतानाचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात शतकी तडाखा देत बटलरने राजस्थान संघाला अंतिम सामन्यात पोहोचवले होते. या सामन्यात त्याने सलामीला फलंदाजीला येत ६० चेंडूत नाबाद १०६ धावांची खेळी केली होती. हे त्याचे आयपीएल २०२२मधील चौथे तर एकूण आयपीएल कारकिर्दीतील पाचवे शतक होते. या शतकी खेळीच्या जोरावर राजस्थानने १८.१ षटकातच हा सामना जिंकला होता आणि अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले होते.
https://twitter.com/Rahulc7official/status/1530899045744783360?s=20&t=BZic9DVSQX0c5kmLdJGBhw
Jos Buttler in tears while talking about Shane Warne.
Rajasthan Royals want to win it for the legend. pic.twitter.com/pgsKKQrAMN
— Saif Ahmed 🇧🇩 (@saifahmed75) May 29, 2022
या खास कामगिरीनंतर बटलर राजस्थानला विजेता बनवणाऱ्या माजी कर्णधार शेन वॉर्न याच्या आठवणीत बोलताना दिसला. वॉर्नचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अशात या दिवंगत दिग्गजाच्या आठवणीत बटलर भावूक झाला आणि चालू व्हिडिओत त्याला ढसाढसा रडू कोसळले. बटलरचे वॉर्नच्या आठवणीत रडतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/AbdullahNeaz/status/1530902250150715394?s=20&t=LtYpFWNshGzCMkVg2XAO1g
बटलर आणि सॅमसनने वॉर्नच्या आठवणीत दिली प्रतिक्रिया
तत्पूर्वी दुसऱ्या क्वालिफायर सामन्यानंतर बटलरने वॉर्नबद्दल प्रतिक्रिया दिली होती. “वॉर्न हा राजस्थान संघाचा एक प्रतिभाशाली खेळाडू होता. पहिल्या हंगामात त्याने संघाला यश मिळवून दिले होते. त्याची आठवण येत आहे. पण, आज तो वरून आमच्याकडे अभिमानाने पाहत असेल”, असे बटलरने म्हटले होते.
तर साल २००८च्या आयपीएल हंगामाच्या अंतिम सामन्यात लक्ष्मीपती बालाजीने टाकलेल्या शेवटच्या षटकात राजस्थानला आठ धावांची गरज होती. नंतर राजस्थानला विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी शेवटच्या चेंडूवर एका धावेची गरज होती. चेन्नई विरुद्ध असलेला हा सामना त्यांनी तीन विकेट्सने जिंकला होता.
या सामन्याची आठवण काढत सॅमसन म्हणाला होता की, “आयपीएलच्या पहिल्या हंगामावेळी मी केरळमध्ये १६ वर्षाखालील क्रिकेट खेळत होतो. त्यावेळी ती एक धाव सोहेल तन्वीरने वॉर्नसोबत काढली होती. हा विजयी क्षण मी कधीच विसरणार नाही.” तसेच तो असेही म्हणाला की, यंदाची आयपीएल शेन वॉर्नसाठी खेळत असून आता केवळ ट्रॉफीपासून एक पाऊल ते दूर आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL Final | फक्त २५ धावा अन् बटलर मोडेल वॉर्नरचा मोठा विक्रम, विराटलाही पछाडण्याची संधी