इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका 8 सप्टेंबरपासून सुरू होईल. चार सामन्यांच्या या वनडे मालिकेसाठी 16 ऑगस्ट रोजी इंग्लंडचा 15 सदस्यीय संघ घोषित केला गेला. वर्षभरापूर्वी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला कसोटी कर्णधार बेन स्टोक्स याने निवृत्ती मागे घेतल्याने, त्याला संघात समाविष्ट केले. दुसरीकडे, मागील दीड वर्षांपासून इंग्लंड क्रिकेटमधील सर्वात चर्चित नाव असलेल्या हॅरी ब्रुक याला या संघात संधी मिळाली नव्हती. त्यामुळे इंग्लंड निवड समितीवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आलेली. मात्र असे असताना आता इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने त्याच्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.
न्यूझीलंडविरुद्धची मालिका तसेच विश्वचषकासाठीच्या प्राथमिक संघात ब्रुक याला संधी न मिळाल्याने अनेक दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली होती. स्वतः ब्रुक याने देखील निराशावादी प्रतिक्रिया दिलेली. असे असताना आता बटलर याने एका क्रिकेट संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले,
“विश्वचषक स्पर्धेसाठी रवाना होण्यास अजून बराच अवधी बाकी आहे. त्यामुळे आम्ही वाट पाहू आणि काय होते याकडे लक्ष देऊ. आपल्या सर्वांना माहित आहे की, हॅरी ब्रुक एक जबरदस्त खेळाडू आहे. त्याच्या दिवशी तो एकहाती सामना जिंकून देऊ शकतो. सध्या तो संघाचा भाग नाही हे त्याचे दुर्दैव आहे.”
वनडे संघातून बाहेर झाल्यानंतर ब्रुक याने द हंड्रेड लीगमध्ये खेळताना जबरदस्त शतक झळकावले होते. या खेळीमुळे त्याने निवडसमितीला चोख उत्तर दिल्याचे बोलले जात होते.
(Jos Buttler Hints Harry Brook Will Make Spot In England ODI Sqaud)
महत्वाच्या बातम्या-
सेलिब्रेशन बनता है! रांचीत धोनीने सीएसके फॅनसोबत साजरा केला आनंद, व्हिडिओ पाहा
आकडे म्हणतायेत नंबर 4 श्रेयसचाच! आशिया कप आणि वर्ल्डकपआधी टीम इंडिया निवांत