राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज (RR vs PBKS) यांच्यात शनिवारी (०७ मे) आयपीएल २०२२चा ५२वा सामना खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांनी मिळून सांघिक कामगिरी करत राजस्थानला १९० धावांचे मोठे आव्हान दिले. दरम्यान राजस्थानकडून जोस बटलर याने भन्नाट झेल घेतला, ज्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. बटलरने मागच्या दिशेने जात असताना एका हाताने हा झेल टिपला, हे खास.
बटलरने (Jos Buttler) हा शानदार झेल पंजाबच्या डावातील पावरप्लेच्या शेवटच्या षटकात घेतला आहे. पंजाबकडून सलामीवीर शिखर धवन आणि जॉनी बेयरस्टो यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती आणि पाचव्या षटकापर्यंत पंजाबने ४६ धावा केल्या होत्या. धवन सहसा फिरकीपटू आर अश्विनपुढे झगडताना दिसला आहे. त्यामुळे राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने पावरप्लेमधील शेवटचे षटक अश्विनला दिले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
अश्विनचा (R Ashwin) डावातील सहाव्या षटकातील पहिला चेंडू वाईड राहिला. त्यानंतर पुन्हा चेंडू फेकल्यावर त्यावर फलंदाज धवनने मिड ऑनवरून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु बटलरने त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरवला. मिड ऑनवर क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या बटलरने हवेत उंच उडी मारली आणि एका हाताने जबरदस्त (Jos Buttler One Handed Catch) झेल घेतला. त्याच्या या सुरेख झेलचे सोशल मीडियावर भरपूर कौतुक होत (Jos Buttler Superman Catch) आहे.
https://twitter.com/Ak34429850/status/1522888577654595584?s=20&t=T912TOQR6vs-u-hnC_QSig
What a catch by Jos Buttler!!! #buttler pic.twitter.com/Ao820cXKGy
— kavya (@place2explore) May 7, 2022
What A Catch By Joss The Boss#buttler #rrvspbks #IPL2022 pic.twitter.com/htUEsPyTGY
— Ajjayy (@BeingAjayJain) May 7, 2022
त्याच्या प्रयत्नांमुळे पंजाबचा सलामीवीर धवन केवळ १२ धावा करून बाद झाला. अगदी धवनदेखील पव्हेलियनला परतताना चकित होऊन पाहात होता.
दरम्यान पंजाबच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांच्याकडून सलामीवीर जॉनी बेयरस्टोने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४० चेंडू खेळताना ५६ धावा फटकावल्या. त्याच्याव्यतिरिक्त जितेश शर्माने नाबाद ३८, भानुका राजपक्षेने २७ आणि लियाम लिविंगस्टोनने २२ धावांचे योगदान दिले. परिणामी पंजाबचा संघ ५ विकेट्सच्या नुकसानावर १८९ धावांपर्यंत मजल मारू शकला. या डावात राजस्थानकडून युझवेंद्र चहलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. ४ षटके गोलंदाजी करताना २८ धावा देत त्याने या विकेट्स घेतल्या. तसेच प्रसिद्ध कृष्णा आणि आर अश्विन यांनीही प्रत्येकी एका विकेटचे योगदान दिले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
शुबमनची भलतीच अंधश्रद्धा! जास्त धावा करता याव्या म्हणून ‘या’ अनुभवी खेळाडूच्या बॅटचा करायचा वापर
ज्याच्या वेगाचं सर्वत्र कौतूक होतंय, त्या उमरान मलिकबद्दल आरपी सिंगचं वक्तव्य विचार करायला लावणारं