श्रीलंकेविरूद्ध खेळल्या जात असलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. या मालिकेच्या उर्वरित सामन्यांमधून उपकर्णधार जोस बटलर बाहेर पडला आहे. बुधवारी पहिल्या टी२० सामन्यावेळी बटलर जखमी झाला होता. दुखापतीतून सावरण्यासाठी तो सध्या घरी रवाना झाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात जोस बटलरने नाबाद ६८ धावा केल्या होत्या.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार, त्याला गुरुवारी एमआरआय स्कॅनसाठी पाठविण्यात आले होते, ज्यात त्याच्या दुखापतीची माहिती समोर आली. त्यामुळे, दुसर्या टी२० सामन्यात तो सहभागी होऊ शकला नाही. इंग्लंडने हा सामना पाच गड्यांनी जिंकून मालिका आपल्या नावे केली.
श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेमध्ये इंग्लंडने २-० अशी आघाडी घेतली आहे. तिसर्या टी२० सामन्यासह बटलरला तीन वनडे सामन्यांच्या मालिकेमधूनही वगळण्यात आले. डेव्हिड मलानचा जोस बटलरच्या जागी श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडची वनडे मालिका २९ जूनपासून सुरू होईल. युवा वेगवान गोलंदाज जॉर्ज गार्टनचा प्रथमच इंग्लंडच्या संघात समावेश करण्यात आला आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना २९ जून रोजी, दुसरा सामना १ जुलैला तर, तिसरा सामना ४ जुलै रोजी खेळला जाईल. ओएन मॉर्गनकडेच इंग्लंडच्या वनडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.
वनडे मालिकेसाठी इंग्लंडचा संघ-
ओएन मॉर्गन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, मोईन अली, सॅम बिलिंग्ज, डेव्हिड मलान, सॅम करन, टॉम करन, लियाम डॉसन, लियाम लिव्हिंगस्टोन, जो रूट, जॉर्ज गार्टन, जेसन रॉय, डेव्हिड विली, आदिल राशिद , ख्रिस वोक्स, मार्क वुड.
इंग्लंड वि श्रीलंका वनडे मालिकेचा कार्यक्रम-
पहिला वनडे सामना- २९ जून, चेस्टर ली स्ट्रीट
दुसरा वनडे सामना- १ जुलै, ओव्हल
तिसरा वनडे सामना- ४ जुलै, ब्रिस्टल
महत्त्वाच्या बातम्या –
“हा जल्लोष अनेक दिवस चालणार” WTC विजेतेपद मिळवून दिल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूची प्रतिक्रिया
न्यूझीलंड संघावरील अभिनंदनाचा ओघ थांबेना; ‘या’ आजी-माजी खेळाडूंनी केले अभिनंदनपर ट्विट