जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामाच्या उर्वरित भागाला सुरूवात होण्यास महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. तत्पूर्वी, या हंगामासाठी उपलब्ध राहू न शकणाऱ्या खेळाडूंची नावे समोर येऊ लागली आहेत. आता यामध्ये राजस्थान रॉयल्सचा अनुभवी सलामीवीर जोस बटलर याची देखील भर पडली आहे.
या कारणाने बटलर मुकणार स्पर्धेला
इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाचा उपकर्णधार व आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करणारा सलामीवीर जोस बटलर याने वैयक्तिक कारणामुळे आयपीएल २०१२ च्या उर्वरित हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची पत्नी लुई ही दुसऱ्यांदा गर्भवती असल्याने तो तिच्या सोबत वेळ घालवू इच्छितो. याबाबतची अधिकृत घोषणा राजस्थान रॉयल्स संघ व्यवस्थापनाकडून करण्यात आली.
पहिल्या सत्रात केली होती शानदार कामगिरी
कोरोना महामारीमुळे आयपीएलचा चौदावा हंगाम मे महिन्यात अर्ध्यातून स्थगित करण्यात आला होता. हंगाम स्थगित होईपर्यंत बटलरने आपल्या दमदार फलंदाजीचे दर्शन घडवले होते. त्याने ७ सामने खेळताना एका शतकाच्या मदतीने २५४ धावा काढल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी ३६.२८ तर, स्ट्राईक रेट १५३.१ असा दमदार राहिला आहे. बटलर २०१८ पासून राजस्थान रॉयल्स संघाचा सदस्य असून, त्याने संघासाठी अनेक महत्त्वपूर्ण खेळ्या केल्या आहेत.
राजस्थानला तिसरा झटका
जोस बटलर उर्वरित हंगामातून बाहेर झाल्याने राजस्थान रॉयल्स संघासमोरील अडचणी वाढल्या आहेत. बटलरपूर्वी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर व अष्टपैलू बेन स्टोक्स हे विदेशी खेळाडू या हंगामात खेळणार नसल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे या तीन प्रमुख खेळाडूंच्या बदली त्याच तोलामोलाचे खेळाडू आणण्याचे आव्हान संघ व्यवस्थापनापुढे असेल. राजस्थान सध्या गुणतालिकेत तीन विजयासह पाचव्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! उर्वरित आयपीएलसाठी आरसीबीच्या ताफ्यात तीन नवे शिलेदार
संदीप शर्माची नवी नवरी नताशा सात्विक आहे ज्वेलरी डिझाईनर, जाणून तिच्याबद्दल सर्वकाही
चेन्नईविरुद्ध कर्णधार विराटने दिली सिंगापूरच्या नव्या भिडूला संधी, वाचा आरसीबीच्या पदार्पणावीराबद्दल