भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ टी२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (०९ जुलै) एजबॅस्टन येथे खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी इंग्लंडच्या टी२० संघाचा कर्णधार जोस बटलर याने खेळाडूंची खास बैठक घेतली आहे. या बैठकीदरम्यान त्याने आपल्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. इंग्लंडला भारताविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. याच पार्श्वभूमीवर त्याने ही खास बैठक घेतली आहे.
उभय संघात केवळ ३ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. अशात भारताविरुद्धचा पहिला टी२० सामना ५० धावांनी गमावल्यानंतर इंग्लंडचे पारडे हलके झाले आहे. अशात दुसरा टी२० सामना जिंकत मालिकेत पुनरागमन करणे इंग्लंडसाठी अत्यंत गरजेचे आहे. जर त्यांना हा सामनाही जिंकण्यात अपयश आले, तर त्यांना मालिकाही गमवावी लागू शकते. त्यामुळे या करा अथवा मरा परिस्थिती असलेल्या सामन्यापूर्वी बटलरने खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचे ठरवले आहे. खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याबरोबरच त्याने संघातील उर्वरित खेळाडूंबरोबर ३० मिनिटांच्या अतिरिक्त सराव सत्रातही भाग घेतला.
बटलरने संघाच्या बैठकीदरम्यान खेळाडूंना सांगितले की, भारताविरुद्ध पुनरागमन करण्यासाठी आम्हाला अधिक जोर द्यावा लागेल. तो म्हणाला की, “पहिला सामना गमावल्यानंतर आम्ही मालिकेत मागे असल्याने आता आमच्या संघाला आमचे शंभर टक्के द्यावे लागतील.”
त्याचवेळी, असे मानले जात आहे की, पहिल्या पराभवानंतरही दुसऱ्या टी-२० सामन्यात यजमान इंग्लंड कोणताही बदल न करता उतरू शकतो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स या टी२० मालिकेचा भाग नाही. यामुळे अष्टपैलू सॅम करन याची संघातील भूमिका महत्त्वाची ठरते. भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात सॅम करनने चांगली कामगिरी केली. आता संघ व्यवस्थापनाला दुसऱ्या टी-२० मध्येही या युवा अष्टपैलू खेळाडूकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० साठी इंग्लंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार), डेव्हिड मलान, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रूक, सॅम कुरान, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड विली, रिचर्ड ग्लेसन, मॅट पार्किन्स
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, दीपक हुडा, रिषभ पंत, सूर्य कुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक/रवींद्र जडेजा,हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
रिषभ पंतच्या येण्याने ‘या’ स्टार सलामीवीराची जागा धोक्यात! दुसऱ्या टी२०त करू शकतो ओपनिंग
विराट अन् रोहितमध्ये रंगणार वरचढ ठरण्याची जंग! कोण बनणार खास ‘त्रिशतका’चा पहिला मानकरी?
भारत का इंग्लंड? दुसऱ्या टी२० सामन्यात खेळपट्टी कोणाला मदत करणार, वाचा एका क्लिकवर






