आयपीएल २०२२मधील २४वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने ३७ धावांनी विजय मिळवला. गुजरातच्या विजयाचा शिल्पकार राहिला स्वत कर्णधार हार्दिक पंड्या. पंड्याने या सामन्यात जबरदस्त कर्णधार खेळी करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत राजस्थानच्या जोस बटलरला मागे टाकले होते. यानंतर बटलरने केलेली कृती क्रिकेटप्रेमींचे मन जिंकणारी अशी राहिली.
तर झाले असे की, या सामन्यात (RR vs GT) राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली होती. परिणामी गुजरातला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये १९२ धावा केल्या. यात कर्णधार हार्दिकच्या (Hardik Pandya) ५२ चेंडूतील नाबाद ८७ धावांचा समावेश होता. त्याने या खेळीदरम्यान ४ षटकार आणि ८ चौकारही मारले होते. यासह त्याच्या ५ सामन्यांमध्ये सर्वाधिक २२८ धावा झाल्या होत्या. यासह त्याने चालू हंगामात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत बटलरला (Jos Buttler) मागे टाकले होते.
यावेळी राजस्थानकडून बटलर ऑरेंज कॅप (Orange Cap) परिधान करून क्षेत्ररक्षण करत होता. परंतु हार्दिक धावांच्या बाबतीत बटलरच्या पुढे गेल्यानंतर राजस्थानच्या या सलामीवीरने आपल्या डोक्यावर ऑरेंज कॅप काढून (Jos Buttler Uncapped Himself) बाजूला ठेवली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
प्रसिद्ध कृष्णाच्या डावातील २०व्या षटकादरम्यान हा प्रसंग पाहायला मिळाला. २०व्या षटकातील पाचव्या चेंडूवर हार्दिकने बटलरला धावांच्या बाबतीत (Hardik Surpassed Buttler) पछाडले. यानंतर बटलरने त्याच्या डोक्यावरील ऑरेंज कॅप काढली आणि आपल्या ट्राउजरमध्ये ठेवली. हा प्रसंग कॅमेरात कैद झाला असून त्याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. बटलरला असे करताना पाहून हार्दिक स्मितहास्य देत त्यावर रिऍक्ट झाला.
अगदी समालोचकही त्याचे कौतुक करताना थकले नाहीत. समालोचक सामन्यादरम्यान म्हणाले की, “बटलरला कदाचित हे कळाले आहे की, हार्दिक त्याच्या पुढे गेला आहे. त्यामुळे त्याने स्वतहून ऑरेंज कॅप काढली आहे.”
Such a gentleman Jos Buttler is .. pic.twitter.com/m42ATqL7tN
— That-Cricket-Girl (@imswatib) April 14, 2022
तसेच आपल्या या कृतीतून बटलरने खिलाडूवृत्ती दाखवली आहे, ज्याची स्तुती माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंगने केली आहे. ‘क्रिकेट या खेळात आजही आमच्याकडे सभ्य माणसे उपलब्ध आहेत. इतर खेळाडूंनी खासकरून त्याच्या संघ सहकाऱ्यांनी जोस बटलरकडून शिकायला पाहिजे,’ असे युवराजने लिहिले आहे.
We still have gentleman in the game of cricket !!! @josbuttler 👏🏽 other players should learn from him specially team mates !!! #IPL2022 #RRvGT
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) April 14, 2022
असे असले तरीही, पुढे गुजरातच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून बटलरने २४ चेंडूत ५४ धावा फटकावल्या आणि पुन्हा ऑरेंज कॅप आपल्या डोक्यावर सजवली. त्याच्या खात्यात सध्या ५ सामन्यांमध्ये २७२ धावा आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
Video: युझवेंद्र चहलने जोस बटलरची केली पायखेची; विचारले, ‘माझ्या फलंदाजीवर का जळतोय?’
बिग ब्रेकिंग.! जो रुटकडून इंग्लंडच्या कसोटी संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा
GT vs RR | रस्सी वॅन डर ड्यूसेनचा कमाल थ्रो! थेट स्टम्पवर चेंडू फेकत वेडला धाडले माघारी, पाहा Video