---Advertisement---

IPL 2026: आयपीएलमध्ये बटलरची ऐतिहासिक कामगिरी; दिल्लीविरुद्ध षटकारांचा पाऊस पाडत रचला नवा इतिहास!

On: बुधवार, एप्रिल 8, 2026 10:15 PM
---Advertisement---

आज आयपीएल 2026 स्पर्धेत दिल्ली विरुद्ध गुजरात संघात सामना खेळला जात आहे. या सामन्यात जोस बटलरने (Jos Buttler) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर षटकारांचा पाऊस पाडत इतिहास रचला. बटलरने एक मोठा विक्रम प्रस्थापित करत आपल्या टी-20 कारकिर्दीत 600 षटकारांचा टप्पा गाठला. यासह बटलरने जगातील दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळवले आहे. या यादीत वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन बटलरच्या वर आहे. पूरनने आतापर्यंत त्याच्या टी-20 कारकिर्दीत 712 षटकार ठोकले आहेत. या यादीत वर पाहिल्यास आंद्रे रसेल, कायरन पोलार्ड आणि ख्रिस गेल यांची नावे आहेत. ख्रिस गेल या यादीत अव्वल स्थानी असून त्याने आपल्या टी-20 कारकिर्दीत 1056 षटकार लगावले आहेत. 1000 हून अधिक षटकार मारणारा गेल हा एकमेव खेळाडू आहे.

टी-20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे 7 फलंदाज

ख्रिस गेल: 1056
कायरन पोलार्ड: 982
आंद्रे रसेल: 784
निकोलस पूरन: 712
जोस बटलर: 600
एलेक्स हेल्स: 595
कॉलिन मुनरो: 582

दिल्लीविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या जोस बटलरने तुफानी खेळी करत 27 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. बटलरच्या या खेळीमुळे गुजरातला चांगली सुरुवात मिळाली. स्पर्धेच्या गेल्या दोन सामन्यांत बटलर आपल्या लयीचा (Form) शोध घेत होता. पंजाबविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चांगली सुरुवात करूनही तो बाद झाला होता, त्याने 38 धावा केल्या होत्या. त्यानंतर राजस्थानविरुद्ध तो केवळ 26 धावाच करू शकला. आता दिल्लीविरुद्धच्या सामन्यात बटलरला तो फॉर्म परत मिळाला आहे, ज्याच्या शोधात तो गेल्या 2 सामन्यांपासून होता.

बटलरच्या टी-20 कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत या फॉरमॅटमध्ये 495 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 466 डावांमध्ये फलंदाजी करताना बटलरने 34.94 च्या सरासरीने आणि 146.11 च्या स्ट्राईक रेटने 13,909 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 8 शतके आणि 98 अर्धशतके झळकावली असून, त्याची सर्वोच्च धावसंख्या 124 आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---