वनडे क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक एबी डिविलियर्स याच्या नावावर आहे. पण आगामी वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याला याबाबत प्रश्न विचारला गेला. बटलर आपल्या धमाकेदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. इंडियन प्रीमियर लीगमध्येही त्याने मागच्या काही हंगामात अशाच प्रदरचे प्रदर्शन केले. पण एबी डिविलियर्सचा विक्रम मोडण्यासाठी तो स्वतःला पात्र समजत नाही, असेच दिसते. बटलनरे नुकतीच याविषयी प्रतिक्रिया दिली.
एबी डिविलियर्स () याने वेस्ट इंडीजविरुद्ध 2015 मध्ये वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक केले होते. अवघ्या 31 चेंडूत 8 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने डिविलियर्सने हा विक्रम केला होता. या सामन्यात तो अवघे 44 चेंडू खेळला आणि 149 धावांची विस्फोटक खेळी केली. त्याने या खेळीमध्ये 16 षटकार मारले होते. हा विक्रम आजही अबाधित असून जोस बटलर () याच्या मते अजूनही सुरक्षित आहे. कारण हा विक्रम मोडणे कोणासाठीच सोपे नसेल.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखीत जोस बटलरला डिविलियर्सचा हा विक्रम मोडण्याबाबत प्रश्न विचारला गेला. या बटलरने उत्तर दिले की, “मी प्रयत्न करेल, पण हे जवळपास अशक्यच आहे. फक्त 31 चेंडूत शतक करणे सोपे नाहीये. मी सर्वात वेगवान शतक 46 चेंडूत केले आहे. या दोन प्रदर्शनांमध्ये जवळपास 15 चेंडूंचे अंतर आहे, जे खूप जास्त असते. मला वाटते मी तेव्हा खूप वेगाने धावा केल्या होत्या. माझ्या मते एबी डिविलियर्सचा हा विक्रम सुरक्षित आहे.”
दरम्यान, जोस बटलर सध्या द हंड्रेड लीग खेळत आहे. त्याच्या नेतृत्वाती मॅनचेस्टर ओरियजिनल्स संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. एलिमिनेटर सामन्यात मॅनचेस्टरने साउदर्न ब्रेव संघाला 7 विकेट्सने पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना साउदर्न ब्रेव संघाने 10 चेंडूत 1 विकेटच्या नुकसानावर 196 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात मॅनचेस्टरने हे लक्ष्य 96 चेंडूत 3 विकेट्सच्या नुकसानावर गाठले. जोस बटलरने 46 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 82 धावांची धुवाधार खेळी केली. (Jos Buttler’s reaction to surpassing AB de Villiers for fastest ODI century)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING: आशिया कपसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा, तब्बल सहा वर्षांनी अष्टपैलूचे पुनरागमन
कसोटीत तिहेरी शतक करणाऱ्या करुण नायरचा मोठा निर्णय, ‘या’ कारणास्तव सोडली कर्नाटक संघाची साथ