आयपीएल 2025च्या 52व्या सामन्यात, आज (3 मे) चेन्नई सुपर किंग्ज आणि राॅयल चॅलेंजर्स बंगुळुरू आमने-सामने आहेत. एम चिन्नास्वामी येथे होत असलेल्या या सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने (Rajat Patidar) पुन्हा एकदा टॉस गमावला आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉस दरम्यान, धोनीने सांगितले की त्यांच्या संघात कोणताही बदल नाही परंतु आरसीबीने एक महत्त्वाचा बदल केला आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (Josh Hazlewood) या सामन्यात खेळत नाही आणि त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीला संधी मिळाली आहे.
टॉस गमावल्यानंतर, रजत पाटीदार म्हणाला की, आम्ही देखील प्रथम गोलंदाजी केली असती. पण विकेटमध्ये फारसा बदल होणार नाही. आम्ही बोर्डवर चांगली धावसंख्या उभारण्याचा आणि त्यांच्यावर दबाव ठेवण्याचा प्रयत्न करू. सर्व खेळाडू चांगल्या मानसिकतेत आहेत आणि त्यांचे काम करत आहेत, कर्णधार म्हणून मला माझ्या खेळाडूंवर खूप विश्वास आहे. आतापर्यंत अनेक खेळाडूंनी संघासाठी कामगिरी केली आहे. हे एक चांगले लक्षण आहे. आमच्याकडे 4 सामने आहेत आणि आम्ही सर्व सामन्यांमध्ये आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू. आतापासून प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे, आम्ही पात्रता पाहत नाही आहोत. आम्ही चारही सामन्यांमध्ये आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू.
यानंतर पाटीदारने सांगितले की हेझलवुड खेळत नाही आणि एनगिडी आला आहे. आरसीबीच्या कर्णधाराने हेझलवुड खेळत नसल्याचे खरे कारण सांगितले नाही परंतु त्याला विश्रांती देण्यात आली असण्याची शक्यता आहे. अन्यथा आरसीबीने एका महत्त्वाच्या सामन्यात आपला मुख्य वेगवान गोलंदाज वगळण्याचा निर्णय घेतला नसता.
जोश हेझलवुडने (Josh Hazlewood) चालू हंगामात आतापर्यंत उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. त्याने 10 सामन्यांमध्ये 17.27च्या सरासरीने 18 विकेट्स घेतल्या आहेत.दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेटही 9 पेक्षा कमी आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): जेकब बेथेल, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टीम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, लुंगी एनगिडी, यश दयाल
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शेख रशीद, आयुष म्हात्रे, सॅम कुरन, रवींद्र जडेजा, डेवाल्ड ब्रेविस, दीपक हुडा, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, मथीशा पाथिराना






