---Advertisement---

IPL 2025: RCB साठी आनंदाची बातमी…! प्लेऑफपूर्वी संघात परतणार ‘हा’ घातक गोलंदाज

On: बुधवार, मे 21, 2025 7:17 PM
---Advertisement---

यंदाचा आयपीएल हंगाम (IPL 2025) आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. त्याच वेळी आयपीएल 2025 च्या प्लेऑफपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (RCB) आनंदाची बातमी आली आहे. जोश हेझलवूडने (Josh Hazlewood) गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे आणि तो लवकरच आरसीबी संघात सामील होऊ शकतो. बंगळुरू संघ आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, हेझलवूडने ब्रिस्बेनमध्ये गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे. तो (25 मे) रोजी बंगळुरू संघात सामील होऊ शकतो.

जोश हेझलवूड (Josh Hazlewood) शेवटचा (27 एप्रिल) रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसला होता. त्यानंतर त्याने खांद्याच्या दुखण्याची तक्रार केली होती, ज्यामुळे तो (3 मे) रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धचा सामना खेळू शकला नाही. गोलंदाजीचा सराव पुन्हा सुरू करणे हे हेझलवूड लवकरच क्रिकेट मैदानावर परतणार असल्याचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.

हेझलवूड सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि प्लेऑफपूर्वी आरसीबीचे अजून 2 सामने शिल्लक आहेत. त्याला (23 मे) रोजी एसआरएच आणि (27 मे) रोजी लखनऊ सुपर जायंट्ससोबत सामने खेळायचे आहेत. जर आपण हेझलवूडच्या कामगिरीवर नजर टाकली तर तो सध्या आयपीएल 2025 मध्ये आरसीबीसाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज (18) आहे. पण, प्लेऑफ सामन्यांसाठी हेझलवूड आरसीबी संघात उपलब्ध असेल की नाही? याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

जोश हेझलवूडची घातक गोलंदाजी हे आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे एक प्रमुख कारण आहे. आरसीबी गेल्या 5 सामन्यांमध्ये हरलेले नाही, ज्यामध्ये पावसामुळे रद्द झालेल्या केकेआरसोबतच्या सामन्याचा समावेश आहे. आरसीबीचा संघ 2016 पासून आयपीएलचा फायनल सामना खेळलेला नाही, परंतु यावेळी आरसीबी रजत पाटीदारच्या (Rajat Patidar) नेतृत्वाखाली पहिले आयपीएल जेतेपद जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे संघ आता उर्वरित सामन्यात कशी कामगिरी करतो हे पाहणेदेखील उत्सुकतेचे ठरेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---