भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (virat kohali) आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (babar azam) हे जगातील सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हणून ओळखले जातात. फाॅरमॅट काहीही असो या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीवर कोणताच परिणाम होत नाही. त्यामुळेच हे दोन खेळाडू तिन्ही फाॅरमॅटच्या आयसीसी क्रमवारीत पहिल्या १० खेळाडूंमध्ये आहेत. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) बुधवारी पुरुषांसाठी आयसीसी क्रमवारी (ICC ranking) जाहीर केली आहे. विराट कोहली आणि बाबर आझम यांच्या खास क्लबमध्ये ऑस्टॅलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड (josh hazlewood) याचा सुद्धा समावेश झाला आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोस हेझलवूड याने आयसीसी टी२० क्रमवारीत आश्चर्यकारक प्रगती केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या टी२० मालिकेत जोस चमकदार कामगिरी करत आहे. सध्या टी२० आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेला हेजलवूड त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसऱ्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे. तसेच तो कसोटी आणि एकदिवसीयमध्ये ८ व्या आणि २ ऱ्या स्थानी आहे. पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सी आहे. या दोघांच्यामध्ये फक्त एकाच गुणाचे अंतर आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या या यादीत भारताचे दोन फलंदाज आहेत.
विराट कोहली एकदिवसीयमध्ये २ ऱ्या स्थानी आणि कसोटीमध्ये ७ व्या तर टी२० मध्ये १० व्या क्रमांकावर आहे. तसेच, भारताचा फलंदाज केएल राहुल या यादीत चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा फखर झमान आणि इंग्लंडचा फलंदाज जो रुट हे पहिल्या १० मध्ये आहेत. पाकिस्तानचा कर्णधार आझम बाबर कसोटीमध्ये प्रथम क्रमांकावर तर टी२० मध्ये नव्या स्थानावर आहे.
कोरोना पाॅझिटीव्ह आलेला श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा तिसरी टी२० खेळू शकला नव्हता. तो टी२० क्रिकेटमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ विकेट घेतल्या होत्या. हसरंगाच्या संघाचा साथी महिश तिक्षना २९ व्या क्रमांकावर आहे. फलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा पथुम निसांकाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांत १२५ धावा करत २१ वे स्थान गाठले आहे.
महत्वाच्या बातम्या-
भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर हिटमॅनने व्यक्त केली नाराजी, म्हणाला.. (mahasports.in)
आरसीबीचा हात धरल्यानंतर दिनेश कार्तिकची केकेआरसीठी भावनिक पोस्ट, वाचा सविस्तर (mahasports.in)
Video: विराट जरा जपून…! पहिल्या टी२०त माजी कर्णधाराची घसरली जीभ, वापरले अभद्र शब्द (mahasports.in)