---Advertisement---

हेजलवूड चाहत्याच्या फिरकीवर बोल्ड! चक्क चूक झाल्याच्या कबुलनाम्यावर केली स्वाक्षरी

On: रविवार, डिसेंबर 12, 2021 3:55 PM
Josh-Hazlewood
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये रंगणाऱ्या ऍशेस मालिकेला जोरदार सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ब्रिसबेनच्या गाबा मैदानावर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने अप्रतिम कामगिरी करत ९ गडी राखून विजय मिळवला. यासह ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. हा सामना सुरू असताना ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडसोबत अशी मजेशीर घटना घडली आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगतेय.

तर झाले असे की, ब्रिस्बेन कसोटी सामना सुरू असताना जोश हेजलवुड सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी एका इंग्लिश प्रेक्षकाने त्याच्यासोबत मस्ती केली. इंग्लंड संघाचे कट्टर समर्थक असणाऱ्यांना ‘बार्मी आर्मी’ असे म्हटले जाते. या ‘बार्मी आर्मीतील एका सदस्याने जोश हेजलवूडला त्याच्या फोटोवर ऑटोग्राफ देण्याची मागणी केली. जोश हेजलवूडने चाहत्याची मागणी पूर्ण करत ऑटोग्राफ दिला. परंतु एक मोठी चूक केली.

जोश हेजलवूडने ज्या फोटोवर ऑटोग्राफ दिला, त्यावर लिहिले होते की, “मी जोश हेजलवूड शप्पत घेऊन सांगतो की, मला माहित आहे तो सॅंडपेपर होता.” बार्मी आर्मीने हा फोटो आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यावर त्यांनी कॅप्शन म्हणून, “जोश हेजलवुडने नुकताच सीमारेषेजवळ येऊन यावर स्वाक्षरी केली आहे, आम्हाला हे माहित होते.” त्यांनी पुढे हसायचे ईमोजी देखील टाकले आहेत.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २०१८ मध्ये कसोटी मालिका पार पडली होती. या मालिकेदरम्यान चेंडू छेडछाड प्रकरण घडले होते. त्यावेळी जोश हेजलवूड देखील ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व करत होता. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडू कॅमरॉन बॅनक्रॉफ्टकडे सॅंडपेपर दिसून आला होता. त्यानंतर कॅमरॉनसह, डेविड वॉर्नर आणि तत्कालिन कर्णधार स्टीव्ह स्मिथला निलंबित करण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या :

हॅपी बर्थडे युवी: युवराज सिंगच्या एखाद्या युवराजासारखा झालेल्या कारकिर्दीचा लेखाजोखा!

‘ऍशेसबद्दल काही ट्वीट का नाही केले?’ चाहत्याच्या प्रश्नावर जाफरचं मन जिंकणारं उत्तर

ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ३:  दादा गुडनाईट बोलून निघून गेला, परंतु युवराज मात्र पूरता घाबरला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---