ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज जोश इंग्लिसला पाकिस्तानविरुद्ध मायदेशात होणाऱ्या आगामी टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. शादनदार फॉर्ममध्ये असलेल्या यष्टीरक्षक फलंदाजाने अनुभवी ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉइनिस यांचा स्थायी-कर्णधारपदाच्या शर्यतीत मागे टाकले. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी जोश इंग्लिस एकदिवसीय संघाचेही नेतृत्व करेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार असून पॅट कमिन्स आणि मिचेल मार्श यांनी कसोटी मालिकेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेतून स्टार खेळाडू बाहेर पडले आहेत.
जोश इंग्लिसने गेल्या वर्षी भारतामध्ये ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी विश्वचषक मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली होती.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी बुधवारी सांगितले, “जोश हा एकदिवसीय आणि टी20 संघांचा अविभाज्य सदस्य आहे. तो मैदानावर आणि मैदानाबाहेर अत्यंत प्रतिष्ठित खेळाडू आहे. त्याने यापूर्वी ऑस्ट्रेलिया अ संघाचे नेतृत्व केले आहे आणि या भूमिकेत तो उत्कृष्ट असेल. तसेच “जोशला ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉइनिससह वरिष्ठ खेळाडू तसेच मॅट शॉर्ट आणि ॲडम झाम्पा सारख्या खेळाडूंकडून मोठा पाठिंबा मिळेल.”
पाकिस्तान विरुद्ध एमसीजी येथे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील सलामीचा सामना ऑस्ट्रेलियाने दोन गडी राखून जिंकला. मालिकेतील पुढील दोन एकदिवसीय सामने ॲडलेड (8 नोव्हेंबर) आणि पर्थ (10 नोव्हेंबर) येथे खेळवले जातील. यानंतर 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान ब्रिस्बेन, सिडनी आणि होबार्टमध्ये उभय संघात तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे.
पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 संघ: जोश इंग्लिस (कर्णधार), शॉन ॲबॉट, झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टॉइनिस, ॲडम झम्पा
हेही वाचा-
“रोहित शर्मा म्हातारा होतोय, त्यानं निवृत्ती…”, भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य
भारतानं 2036 ऑलिम्पिकसाठी ठोकला दावा, गुजरातमधील या शहराला मिळू शकतं यजमानपद
SA VS IND; 6 षटकार आणि विश्वविक्रम, पहिल्याच टी20 मध्ये कर्णधार सूर्याकडे इतिहास रचण्याची संधी!