भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात आगामी बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) खेळली जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ते जॉर्ज बेली (George Bailey) यांनी सोमवारी (28 ऑक्टोबर) रोजी संकेत दिले की, सध्या फॉर्ममध्ये असलेला ऑस्ट्रेलियन फलंदाज जोश इंग्लिस (Josh Inglis) आगामी होणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये कसोटी पदार्पण करण्याची शक्यता आहे.
जाॅर्ज बेलीने (George Bailey) पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “इंग्लिस सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे, मला वाटते की तो एक फलंदाज म्हणून ज्या प्रकारे कामगिरी करत आहे, ते पाहता तो वर्षभर वेगवेगळ्या मालिकांमध्ये सहभागी होऊ शकतो.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “उन्हाळ्यात वर्षभर योग्य संधी उपलब्ध झाली आणि ज्या ठिकाणी इंग्लिस चमकदार कामगिरी करण्यास योग्य आहे, त्या ठिकाणी त्याचा समावेश केला जाऊ शकतो, असे मला वाटते. इंग्लिस हा ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय आणि टी20 यष्टीरक्षक आहे, त्याने गेल्या 7 शेफिल्ड शिल्ड सामन्यांमध्ये 4 शतके झळकावली आहेत. पण ऑस्ट्रेलियन कसोटी यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरी सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. दरम्यान इंग्लिस सुद्धा उत्कृष्ट फाॅर्ममध्ये आहे.”
बेली म्हणाले, “मी जोश इंग्लिसशी याबद्दल बोललो आहे, मला वाटत नाही की, तो असा खेळाडू आहे ज्याला आपण टॉप ऑर्डरमध्ये ठेवू इच्छितो. पाकिस्तानविरूद्धच्या आगामी 3 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या टी20 संघाचे नेतृत्व करण्यासाठी इंग्लिस हा एक दावेदार आहे. नियमित टी20 कर्णधार मिचेल मार्शसह सर्व फॉरमॅटमधील खेळाडू बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या तयारीसाठी पाकिस्तान मालिकेतून बाहेर आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025; केकेआर ‘या’ 5 खेळाडूंना करणार रिटेन? कर्णधाराचा पत्ता कटणार
AUS vs PAK; टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर, पण कर्णधाराचीच नाही केली घोषणा!
पंत नाही तर ‘हा’ होता, बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी जिंकवणारा खरा हीरो, दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य!