---Advertisement---

टीम इंडियाला 440 व्होल्टचा झटका, ‘हा’ वेगवान गोलंदाज 3 महिन्यांसाठी क्रिकेटपासून दूर!

On: सोमवार, ऑक्टोबर 28, 2024 8:12 PM
---Advertisement---

बीसीसीआयने नुकतीच दक्षिण आफ्रिका दौरा आणि बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या दोन्ही मालिकांमध्ये असे अनेक खेळाडू होते ज्यांची संघात निवड होईल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, त्यांना संधी देण्यात आली नाही. वेगाचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा वेगवान गोलंदाज मयंक यादवची निवड करण्यात आली नाही. तो दुखापतीमुळे बाहेर आहे. 22 वर्षीय वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे आगामी कसोटी मालिकेसाठीच नव्हे तर जवळपास 3 महिने क्रिकेटपासून दूर राहू शकतो.

मयंक यादवने बांगलादेशविरुद्धच्या त्याच्या शानदार पदार्पणाच्या मालिकेत तीन टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 6 विकेट घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, दक्षिण आफ्रिकेसाठी निवडलेल्या संघात त्याला संधी मिळाली नाही. कारण तो पुन्हा दुखापतग्रस्त आहे. एका वृत्तानुसार, मयंक यादवला पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. तो आयपीएल 2024 मध्ये केवळ 4 सामने खेळला होता. त्यानंतर त्याने थेट बांगलादेशविरुद्ध सामना खेळला. त्यानंतर तो चौथ्या किंवा पाचव्या फेरीपासून रणजी ट्रॉफी खेळेल, अशी शक्यता होती. मात्र, आता ही योजनाही रद्द करण्यात आली आहे.ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी राखीव वेगवान गोलंदाज म्हणूनही मयंकला संधी मिळाली नाही.

एका बीसीसीय ‌अधिकाऱ्याने सांगितले की, “त्याच्या पाठीत काही समस्या आहे. हे तणाव फ्रॅक्चरचे प्रकरण देखील असू शकते. नॅशनल क्रिकेट अकादमीच्या मते, तो रणजी ट्रॉफीच्या चौथ्या किंवा पाचव्या फेरीत खेळू शकला असता, पण आता ते शक्य नाही. तो पुन्हा बराच काळ राहणार बाहेर आहे.”

मयंकचे वैयक्तिक प्रशिक्षक देवेंद्र शर्मा यांनी सांगितले की, संघ व्यवस्थापनाने त्याला खेळण्यास मनाई केली आहे. अशा परिस्थितीत तो फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत पुनरागमन करू शकतो. सध्या, फेब्रुवारी 2025 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत तो पुनरागमन करू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

IPL 2025; केकेआर ‘या’ 5 खेळाडूंना करणार रिटेन? कर्णधाराचा पत्ता कटणार
AUS vs PAK; टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर, पण कर्णधाराचीच नाही केली घोषणा!
पंत नाही तर ‘हा’ होता, बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी जिंकवणारा खरा हीरो, दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---