इंडियन प्रीमिअर लीग 2023च्या हंगाम पुढील वर्षी होणार आहे. त्यापूर्वी 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएल 2023 मिनी लिलाव पार पडला. एकूण 79 खेळाडू या लिलावात विकले गेले. अनेक खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लागली. यामध्ये एक नाव आयर्लंडचा युवा वेगवान गोलंदाज जोशुआ लिटल याचे देखील आहे. मागील हंगामात नेट बॉलर ते यंदा करोडपती असा प्रवास त्याने केला आहे. तसेच, आयपीएल इतिहासात विकला जाणारा तो पहिला आयरिश क्रिकेटपटू बनला.
J-Lit! 🔥#TATAIPL | #AavaDe pic.twitter.com/VKUDWWhewb
— Gujarat Titans (@gujarat_titans) December 24, 2022
आयर्लंड संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेला लिटल डाव्या हाताने गोलंदाजी करतो. या लिलावात 5 आयरिश खेळाडूंची नावे सामील करण्यात आलेली. त्यापैकी एकट्या लिटल याच्यावर बोली लावली गेली. गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्स व कोलकाता नाईट रायडर्स यांना मागे सोडत तब्बल 4 कोटी 40 लाखांच्या रकमेसह त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. आयपीएलच्या इतिहासात बोलू लागलेला तो पहिला आयरिश क्रिकेटपटू ठरला.
याच लिटलने मागील वर्षी चेन्नई सुपर किंग्सने आपल्याला अपमानित केल्याचा आरोप लावला होता. तो म्हणालेला,
“मी केवळ दोन आठवड्यात त्यांचा कॅम्प सोडून निघून आलो होतो. मला त्यांनी संघात सामील करताना असे म्हटले होते की, तू संघासोबत राहशील आणि कोणी दुखापतग्रस्त झाले तर तुला संधी मिळू शकते. मात्र, तेथील परिस्थिती वेगळीच होती. ते मला नेट बॉलर म्हणूनही केवळ दोन षटके टाकण्यासाठी देत. मला याची वेळोवेळी जाणीव होत होती की, मी इथे केवळ नेट बॉलर म्हणून आलो आहे. मी एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होतो आणि वर्षभरात माझी कामगिरी चांगली झालेली. त्यामुळे मी लवकरच तो कॅम्प सोडण्याचा निर्णय घेतला.”
लिटल हा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज असून, लंकन प्रीमियर लीग तसेच द हंड्रेड या मोठ्या लीगमध्ये देखील त्याने सहभाग नोंदवला आहे. तसेच टी20 विश्वचषकात त्याने हॅट्रिक मिळवण्याची कामगिरी देखील केली होती. याच कारणाने त्याला आयपीएलमध्ये मोठी रक्कम मिळाल्याचे बोलले जात आहे.
(Joshua Little Brought By Gujrat Titans In IPL 2023 Auction)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
करन आयपीएल इतिहासातील महागडा खेळाडू, पण चर्चा फक्त त्याच्या गर्लफ्रेंडचीच; लव्हलाईफबद्दल वाचाच
लिलावात सर्वाधिक रक्कम घेऊन उतरलेल्या हैद्राबादने ‘या’ तिघांवरच उधळले 26 कोटी, पाहा संपूर्ण संघ