टी20 विश्वचषक 2022च्या स्पर्धेत वेस्ट इंडिजला स्पर्धेतून बाहेर काढणाऱ्या आणि इंग्लंडला पराभवाचा धक्का देणाऱ्या आयर्लंडने शुक्रवारी (4 नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्ध दोन हात केले. न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड यांच्यात सुपर 12चा 37वा सामना खेळला गेला. हा सामना ऍडलेडच्या ओव्हल मैदानावर खेळला गेला. यामध्ये न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट्स गमावत 185 धावांचा डोंगर रचला. यावेळी आयर्लंडच्या एका गोलंदाजाने प्रभावी कामगिरी करत ऐतिहासिक यादीत प्रवेश केला. जोशुआ लिटल याने या स्पर्धेतील दुसरी हॅट्ट्रीक आपल्या नावावर केला आहे.
वेगवान गोलंदाज जोशुआ लिटल (Joshua Little) याने 4 षटकात 22 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यामधील त्याचे शेवटचे षटक चकित करणारे ठरले. तो न्यूझीलंडच्या डावातील 19वे षटक टाकण्यास आला. तेव्हा षटकातील दुसऱ्याच चेंडूवर त्याने न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याला गॅलेथ डेलानी याच्याकरवी झेलबाद केले. विलियमसन 35 चेंडूत 61 धावा करत तंबूत परतला. षटकातील पुढच्याच चेंडूवर त्याने जिमी निशाम याला गोल्डन डकवर पायचीत केले आणि चौथ्या चेंडूवर मिशेल सॅंटनर याची विकेट घेत विश्वचषकाच्या इतिहासात सहावी हॅट्ट्रीक नोंदवली. ही या आठव्या विश्वचषकातील दुसरी हॅट्ट्रीक आहे. जोशुआच्या आधी कार्तिक मयप्पन याने श्रीलंकेविरुद्ध हॅट्ट्रीक केली.
टी20 विश्वचषकात सर्वात पहिली हॅट्ट्रीक ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली याच्या नावावर आहे. त्याने पहिल्याच टी20 विश्वचषकाच्या हंगामात बांगलादेश विरुद्ध ही कामगिरी केली होती. त्यानंतर दुसरी हॅट्ट्रीक 2021च्या स्पर्धेत पाहायला मिळाली. आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फर याने नेदरलॅंड्स विरुद्ध हॅट्ट्रीक केली होती. यामुळे लिटल हा टी20 विश्वचषकात हॅट्ट्रीक घेणारा आयर्लंडचा दुसराच खेळाडू ठरला. 2021मध्ये कॅम्फर बरोबरच दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा आणि श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा यांनी ही एका षटकात सलग तीन विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.
https://www.instagram.com/reel/CkhxZ1no5p-/?utm_source=ig_web_copy_link
टी20 विश्वचषकातील हॅट्ट्रीक-
ब्रेट ली वि. बांगलादेश, केप टाउन 2007
कर्टिस कॅम्फर वि. नेदरलॅंड्स, अबू धाबी 2021
वानिंदू हसरंगा वि. दक्षिण आफ्रिका, शारजाह 2021
कागिसो रबाडा वि. इंग्लंड, शारजाह 2021
कार्तिक मयप्पन वि. श्रीलंका, जिलॉन्ग 2022
जोशुआ लिटल वि. न्यूझीलंड ऍडलेड 2022
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रेयस अय्यरची फिफ्टी-रहाणेची कॅप्टन्सी, मुंबईची पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये एंट्री
पुणेरी पलटणचा कर्णधार फझेल अत्राचलीने मानले चाहत्यांचे आभार! म्हणाला,’ आम्हाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियमवर…’