कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स या पहिल्या क्वालिफायर सामन्यात एकदा जोस बटलर याने (Jos Buttler) तुफानी खेळी. या सामन्यात राजस्थानला ७ विकेट्सने पराभव पत्करावा लागला असला तरीही बटलरने नवीन विक्रम नोंदवला आहे. या सामन्यात त्याने ५६ चेंडूत ८९ धावांची खेळी केली.
जोस बटलर (Jos Buttler) हा या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने ऑरेंज कॅप आपल्याकडेच ठेवली आहे. यावेळी त्याने १५ सामन्यांमध्ये ५१.२९च्या सरासरीने ७१८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या तीन शतके आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. तो या हंगामामध्ये ७००पेक्षा अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज आहे.
एकाच आयपीएल हंगामात ७०० पेक्षा अधिक धावा करण्यारे फलंदाज-
९७३ – विराट कोहली ( २०१६)
८४८ – डेविड वॉर्नर (२०१६)
७३५ – केन विलियमसन (२०१८)
७३३ – क्रिस गेल (२०१२)
७३३ – माइक हसी (२०१३)
७१८ – जोस बटलर ( २०२२)*
७०८ – क्रिस गेल (२०१३)
गुजरातविरुद्ध ८९ धावा केल्याने बटलरचा एकाच आयपीएल हंगामात ७००पेक्षा अधिक धावा करण्याऱ्या फलंदाजांच्या यादीत समावेश झाला आहे. आयपीएलच्या एका हंगामामध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (आरसीबी) विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर आहे. त्याने २०१६च्या आयपीएलमध्ये ९७३ धावा केल्या होत्या. तसेच, त्यावेळी त्याने केलेल्या चार शतकांचा विक्रम अजूनही कायम आहे.
या आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार आणि षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बटलरच अव्वल क्रमांकावर आहे. त्याने ६८ चौकार आणि ३९ षटकार ठोकले आहे.
गुजरात विरुद्धच्या क्वालिफायर सामन्यात बटलरने फलंदाजीला संथ सुरूवात केली होती. त्यातच तो दोन वेळा बाद होता होता वाचला होता. पहिल्या ३९ धावा त्याने ३८ चेंडूत केल्या नंतरच्या १८ चेंडूत त्याने तुफान फटकेबाजी करत ५० धावा जोडल्या. ११६ ही त्याची या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या आहे. या धावा त्याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध ६५ चेंडूत काढल्या होत्या.
यष्टीरक्षक बटलरने २०१६च्या हंगामामध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. यावेळी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या रायझिंग पुणे जायंट्स विरुद्धच्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Qualifier 1| गुजरातविरुद्ध राजस्थानकडून झाल्या ३ मोठ्या चूका; अश्विन-चहलही ठरले पराभवाचे कारण
लिलावात पहिल्याच दिवशी अनसोल्ड राहिलेला मिलर राजस्थानला भारी पडत ‘असा’ झालेला गुजरातमध्ये सामील
“दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है”, मिलरच्या ट्वीटला राजस्थानचा भन्नाट रिप्लाय