क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेर वादविवाद हे आता सामान्य झाले आहे. जेव्हा दोन खेळाडूंमध्ये वाद होतात, तेव्हा त्या वादावर इतर लोकही आपल्या प्रतिक्रिया देत असतात. काहीवेळा ते एकाला पाठिंबा देतात, तर दुसऱ्याचं नाव न घेता त्याच्यावर टीकास्त्र सोडतात. आयपीएल 2023 स्पर्धेतही असेच काहीसे पाहायला मिळत आहे. आयपीएल 2023चा 65वा सामना गुरुवारी (दि. 18 मे) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअम, हैदराबाद येथे पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने-सामने होते. हा सामना आरसीबीने 8 विकेट्सेन जिंकला आणि प्ले-ऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. दरम्यान आरसीबीच्या डावात विराट कोहली याने शानदार शतक झळकावले. यावर प्रसिद्ध पत्रकाराने नाव न घेता गौतम गंभीर याच्यावर निशाणा साधला.
विराट कोहली (Virat Kohli) याने 63 चेंडूत 100 धावांची वादळी खेळी केली. यामुळे आरसीबी (RCB) संघाने 4 चेंडू शिल्लक ठेवत सामना 8 विकेट्सने नावावर केला. या विजयानंतर जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी विराट कोहलीला शतकासाठी शुभेच्छा दिल्या. यामध्ये पत्रकार रजत शर्मा (Journalist Rajat Sharma) यांचाही समावेश होता. त्यांनी विराटच्या शतकावर प्रतिक्रिया देत गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. यापूर्वीही रजत शर्मा यांनी विराट कोहली आणि गौतम गंभीर (Virat Kohli And Gautam Gambhir) यांच्या वादात मत मांडले होते. मात्र, यावेळी रजत यांनी नाव न घेता गंभीरवर निशाणा साधला.
रजत शर्मांचे ट्वीट
रजत शर्मा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केले. त्यात त्यांनी लिहिले की, “विराटकडून शानदार शतक पाहायला मिळाले. ही खेळी पाहून आनंद झाला. अर्थातच, एखादा व्यक्ती कुठे ना कुठे खुश नसेल.”
रजत शर्मा यांच्या या ट्वीटचा इशारा गंभीरकडे असल्याचे म्हटले जात आहे. कारण, यापूर्वीही रजत शर्मांनी लाईव्ह टीव्हीवर म्हटले होते की, गौतम गंभीरला विराट कोहलीची लोकप्रियता आवडत नाही. त्यामुळे तो लखनऊ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झालेल्या सामन्यात त्याला भिडताना दिसला होता. तसेच, रजत शर्मांच्या या ट्वीटवर आता चाहतेही प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. गौतम गंभीर (Gautam Gambhir) यालाही पुन्हा एकदा ट्रोल केले जात आहे.
या विजयासह आरसीबी संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी विराजमान झाला आहे. त्यांचे 13 सामन्यात 14 गुण झाले आहेत. अशात त्यांना 21 मे रोजी स्पर्धेच्या अखेरच्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा सामना करायचा आहे. त्यांना हा सामना जिंकणे खूपच गरजेचे आहे. (Journalist rajat sharma takes dig at gautam gambhir after virat kohli century against srh ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्लासेनने शतक झळकावत विराटलाही पाडले कौतुक करण्यास भाग, मन जिंकणारी रिऍक्शन पाहिली का?
‘फाफ आणि कोहलीने आमच्या…’, म्हणत बालेकिल्ल्यात दारुण पराभव होताच हळहळला सनरायझर्सचा कॅप्टन मार्करम






