पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने माजी दिग्गज वेगवान गोलंदाज जुनैद खान याची पाकिस्तानच्या 19 वर्षांखालील संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. वास्तविक, आतापर्यंत 19 वर्षांखालील संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक असलेल्या रेहान रियाझ याने कौटुंबिक कारणामुळे 2024 च्या विश्वचषकातून आपले नाव मागे घेतले आहे आणि त्यामुळे जुनेद खानची संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता त्याच्यावर संघाची मोठी जबाबदारी असणार आहे.
जुनेद खान (Junaid Khan) याच्याबद्दल बोलायचे झाले तर, तो यापूर्वी इस्लामाबाद संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. अलीकडेच हनिफ मोहम्मद करंडक स्पर्धेत त्याने आपल्या प्रशिक्षणाखाली संघाला विजय मिळवून दिला. जुनैद खानने पाकिस्तानसाठी 22 कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने 71 विकेट्स घेतल्या. याशिवाय 76 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 110 विकेट्स आहेत. जुनैद खान खूप चांगला गोलंदाज होता पण त्याची कारकीर्द फार काळ टिकली नाही.
जुनैद खान याने 2023 च्या विश्वचषकामध्ये पाकिस्तान संघाच्या पराभवासाठी कर्णधार बाबर आझम याला जबाबदार धरले होते. बाबर आझममध्ये आक्रमकतेचा अभाव असल्याचे तो म्हणाला होता. त्यावेळी तो म्हणाला, “पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्याकडे बघा त्याने ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय विश्वचषक जिंकून दिला. तो आक्रमक आहे. विराट कोहली (Virat Kohli) यानेही संघर्ष केला पण त्याच्यात ती आक्रमकता आहे. एमएस धोनी (Ms Dhoni) याच्या निवृत्तीनंतरही तो संघर्ष करत राहिला, पण त्याचा रेकॉर्ड अजूनही चांगला आहे. लोक म्हणतील की धोनी आणि स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) आक्रमक नव्हते पण त्यांना संघाचे नेतृत्व कसे करायचे हे माहित आहे. बाबरकडे हे गुण नाहीत. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्हाला आक्रमकता दाखवावी लागेल. त्याने चार वर्षे सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधारपद भूषवले आहे पण त्यात कोणतीही प्रगती झालेली नाही.” (Pakistan has announced a new bowling coach former veteran bowler will take charge)
हेही वाचा
भारताविरुद्धच्या WTC फायनलपूर्वीच वॉर्नर घेणार होता निवृत्ती, ‘या’ कारणामुळे बदलला निर्णय
Team India Schedule 2024: टीम इंडिया IPL आधी खेळणार कसोटी मालिका, नंतर टी20 विश्वचषक, जाणून घ्या संघाचे संपूर्ण वेळापत्रक