महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि चिंचपोकळी सार्वजनिक उस्तव मंडळ आयोजित राज्यस्तरीय कुमार गट “चिंतामणी चषक” कबड्डी स्पर्धाच काल (९ जानेवारी) सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडांगणवर (लाल मैदान) थाटात उद्घाटन झाले. शिवसेनेचे स्थानिक आमदार अजय चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी नगरसेवक सिंधुताई मसुरकर, नगरसेवक रमाकांत रहाटे, अभिनेत्री दीपाली सय्यद उपस्थित होते. फटकाच्या आतेशबाजीने व रंगेबिरंगी लाईटच्या रोषणाईने स्पर्धाच उद्घाटन झाले.
यावेळी अखिल भारतीय कबड्डी महासंघाचे पंच समन्वय समितीचे व मुंबई शहर कबड्डी असो. कार्यवाह विश्वास मोरे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे संयुक्त कार्यवाह रविंद्र देसाई, पंच मंडळाचे अध्यक्ष मनोहर इंदुलकर, पंच सेक्रेटरी शशिकांत राऊत, शिवछत्रपती पुरस्कार विजेते तारक राऊळ यादी मान्यवर उपस्थित होते.
चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पंचाचा ब्लेझर देऊन सन्मान करण्यात आला. प्रथमचं राज्यस्तरीय स्पर्धेत पंचाचा अश्याप्रकारे सन्मानित करण्यात आले.
राज्यस्तरीय कुमार गट स्पर्धाचा पहिला उद्घाटन सामना दुर्गामाता स्पो. क्लब मुंबई विरुद्ध श्री साई स्पो. क्लब नाशिक यांच्यात झाला. मध्यंतरपर्यत २६-०८ अशी भक्कम आघाडी दुर्गामाता संघाकडे होती. एकतर्फी वाटणारा हा सामना मध्यंतरानंतर चांगला चुरशीचा झाला. नाशिकच्या संघाने जोरात मुसंडी मारत दुर्गामाता संघावर दोन लोन केले. अटीतटीच्या या लढतीत दुर्गामाता संघाने ३३-३१ असा सामना जिंकत विजयी सलामी दिली. दुर्गामाता संघा कडून प्रथमेश पालांडे व करण कदम यांनी चांगला खेळ केला. नाशिकच्या शाकीब सय्यदने चांगला खेळ केला.
दुसऱ्या सामना बंड्यामारुती मुंबई विरुद्ध जय बजरंग रायगड यांच्यात झाला. जय बजरंग रायगड ने ४६-२३ असा एकतर्फी विजय मिळवला. शुभम मोरे व सागर जाधव यांची विजयात मोलाची भूमिका होती. उत्कर्ष क्रीडा मंडळ पुणे संघाने पार्ले स्पो. उपनगर संघाला ५२-१० असे सहज नमावले.
वाघजाई क्रीडा मंडळ रत्नागिरी विरुद्ध एस.एस.जी फाउंडेशन मुंबई यांच्यात झालेल्या सामन्यात वाघजाई रत्नागिरी संघाने ४६-१८ अशी बाजी मारली. गोल्फदेवी सेवा मंडळ विरुद्ध झालेल्या सामन्यात बंड्यामारुती संघाला ३१-६२ असे पराभवाला सामोरे जावे लागले. गटातील दोन्ही सामने पराभूत झाल्याने बंड्यामारुती संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
पहिल्या दिवसातील संक्षिप्त निकाल.
१) दुर्गामाता स्पो. मुंबई ३३ विरुद्ध श्री साई स्पो. नाशिक ३१
२) बंड्यामारुती मुंबई विरुद्ध जय बजरंग रायगड
३) उत्कर्ष क्रीडा मंडळ पुणे विरुद्ध पार्ले स्पो. क्लब उपनगर
४) वाघजाई क्रीडा मंडळ रत्नागिरी विरुद्ध एस.एस.जी. फाऊंडेशन मुंबई
५) विजय बजरंग व्या. मुंबई ४२ विरुद्ध स्फूर्ती मंडळ उपनगर २५
६) बंड्यामारुती मुंबई ३१ विरुद्ध गोल्फादेवी मुंबई ६२
७) जय दत्तगुरु मुंबई २७ विरुद्ध ग्राफिन जिमखाना ठाणे ५०
८) उत्कर्ष क्रीडा मंडळ पुणे ४३ विरुद्ध सिद्धीप्रभा मुंबई १६