क्राईस्टचर्च। कालपासून(29 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात हेगली ओव्हल स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव 235 धावांवरच संपुष्टात आला.
या डावात भारताकडून अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने 2 विकेट्स घेण्याबरोबरच क्षेत्ररक्षण करतानाही नील वॅगनरचा एकहाती शानदार झेल घेतला. या झेलबद्दल जडेजा म्हणाला मलाही कळाले नाही की मी झेल घेतला आहे.
या डावात मोहम्मद शमीने टाकलेल्या 72 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर वॅगनरने पूल शॉट मारला. यावेळी डिप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करत असलेल्या जडेजाने वर उडी मारत डावा हात उंचावत अफलातून झेल घेतला. त्यामुळे वॅगनरला 21 धावांवर त्याची विकेट गमवावी लागली. तसेच यामुळे त्याची आणि काईल जेमिसनची 8 व्या विकेटसाठी केलेली 51 धावांची भागीदारीही तुटली.
न्यूझीलंडचा डाव संपल्यानंतर जडेजाला या झेलबद्दल विचारण्यात आले तेव्हा जडेजा म्हणाला, ‘मी अपेक्षा केली होती की तो (वॅगनर) डिप स्क्वेअर लेगला धावा करेल. पण मी चेंडू तिथे इतक्या वेगात येईल अशी अपेक्षा केली नव्हती. हवेमुळे चेंडू इतका वेगात आला आणि मी लगेचच माझा हात वर उंचावला.’
पुढे जडेजा म्हणाला, ‘मी जेव्हा झेल घेतला तेव्हा मलाही काय झाले कळाले नाही. आम्ही गोलंदाजी करताना चांगली सांघिक कामगिरी केली. आम्ही आता चांगली फलंदाजी करण्याचा आणि नंतर पून्हा त्यांना सर्वबाद करण्याचा प्रयत्न करु.’
https://twitter.com/Wrongun8/status/1233989451036184576
या सामन्यात भारताने पहिल्या डावात 242 धावा केलेल्या असल्याने आणि न्यूझीलंडला पहिल्या डावात 235 धावांवर रोखले असल्याने 7 धावांची आघाडी घेतली आहे. तसेच सध्या दुसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 6 बाद 90 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात घेतलेल्या 7 धावांच्या आघाडीमुळे सध्या भारत 97 धावांनी पुढे आहे.
१६ वर्षीय शेफाली वर्माला टीम इंडियाकडून मिळतोय या गोष्टीसाठी मोठा पाठिंबा
वाचा- ????https://t.co/xgGGHSqUB9????#म #मराठी #cricket #TeamIndia @TheShafaliVerma— Maha Sports (@Maha_Sports) March 1, 2020
दुखापतीमुळे हा खेळाडू आयपीएलच्या सामन्यांना मुकणार? फिजिओवर प्रश्नांचा भडीमार…
वाचा- ????https://t.co/PI553OKwKb????#म #मराठी #Cricket #TeamIndia #IPL2020— Maha Sports (@Maha_Sports) March 1, 2020





