---Advertisement---

“गाफील राहू नका, अजून विराट तिथे आहे”, माजी प्रशिक्षकाचा ऑस्ट्रेलियन संघाला इशारा

On: रविवार, जून 11, 2023 12:02 PM
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा किताब जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने भारतीय संघासमोर भल्यामोठ्या 444 धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 बाद 164 धावा केल्या आहेत. सध्या ऑस्ट्रेलिया संघ या सामन्यात पुढे असला तरी, ऑस्ट्रेलियन संघाचे माजी प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी आपल्या संघाला एक इशारा दिला आहे.

ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात मिळालेल्या 173 धावांच्या आघाडीला पुढे वाढवत दुसऱ्या डावातही दमदार फलंदाजी केली. ऍलेक्स केरी व मिचेल स्टार्क यांनी केलेल्या शानदार भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाची आघाडी 443 इतकी झाली.

विजयासाठी मिळालेल्या 444 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 3 बाद 164 धावा केल्या होत्या. विराट कोहली 44 तर अजिंक्य रहाणे 20 धावा काढून नाबाद आहेत. ही स्पर्धा आपल्या नावे करण्यासाठी भारतीय संघाला अखेरच्या दिवशी 280 धावा कराव्या लागतील.

ऑस्ट्रेलियन संघ या परिस्थितीत विजयाचा दावेदार दिसत असला तरी, या सामन्यात समालोचकाची भूमिका बजावणाऱ्या लॅंगर यांनी ऑस्ट्रेलिया संघाला सावध राहण्याची सूचना केली आहे. लॅंगर म्हणाले,

“विराट कोहली खेळपट्टीवर असताना भारतीय संघ अजूनही सामना जिंकू शकतो. महान खेळाडू चमत्कार घडवतात. कोहलीला बाद करेपर्यंत ऑस्ट्रेलिया खेळाडू सुटकेचा निःश्वास टाकू शकत नाहीत.”

‌रोहित शर्मा बाद झाल्यानंतर  विराट कोहली याचे चौथ्या क्रमांकावर खेळपट्टीवर आगमन झाले. त्याने सुरुवातीपासूनच अतिशय आत्मविश्वासाने फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना कोणतीही संधी न देता त्याने आपली खेळी पुढे नेली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा 60 चेंडूवर 44 धावा काढून तो नाबाद आहे. यात त्याने सात चौकार मारले.

(Justin Langer Said Australia Can’t Be Relax Till Virat Kohli At The Crease In WTC Final)

महत्वाच्या बातम्या –
कसोटीत पाचव्या दिवसाचा बॉस आहे कोहली! ‘ही’ आकडेवारी उंचावतेय चाहत्यांच्या अपेक्षा 
सचिननंतर विराटच! WTC फायनलचा मौका साधून ‘किंग कोहली’ने केला महापराक्रम 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---