---Advertisement---

“मला पाठीमागे खूप नावे ठेवली गेली”; ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेत्या प्रशिक्षकाने व्यक्त केली खंत

On: बुधवार, नोव्हेंबर 23, 2022 4:12 PM
---Advertisement---

चालू वर्षी फेब्रुवारी महिन्यात ऍशेस मालिका जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षकपद सोडले होते. आपल्या कार्यकाळात ऑस्ट्रेलिया संघाला यशाच्या शिखरावर देणाऱ्या लॅंगर यांच्या जागी ऍण्ड्रू मॅकडोनाल्ड यांना संधी दिली गेलेली. आता लॅंगर यांनी आपल्या कार्यकाळाविषयी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ज्यामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये वादळ निर्माण होऊ शकते.

सन 2018 च्या बॉल टॅम्परिंगच्या घटनेनंतर लँगर यांची ऑस्ट्रेलियन संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या प्रशिक्षणाखाली ऑस्ट्रेलियन संघाची कामगिरी संमिश्र राहिली. त्यांच्याच मार्गदर्शनात ऑस्ट्रेलियाला भारताकडून मायदेशात दोनदा कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, टी20 विश्वचषक आणि ऍशेस मालिकेत संघाने बाजी मारली होती. अशा स्थितीत लँगर यांची ऑस्ट्रेलियन संघाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तसे झाले नाही.

आता राजीनामा दिल्याच्या 10 महिन्यानंतर लँगर यांनी मोठा आरोप केला आहे. काही वरिष्ठ खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्य होते ज्यांना मी प्रशिक्षक म्हणून कायम राहावे असे वाटत नव्हते. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतलेल्या निर्णयाचा मी आदर करतो. ते म्हणाले,

“जेव्हा लोक माझ्यासोबत असायचे तेव्हा ते एकदम चांगले वागायचे.‌ मात्र, माझ्या पाठीमागे मला नावे ठेवली जायची.‌ मीडियातून मला या गोष्टी समजायच्या.‌ व लोक सूत्र सांगतात असे म्हणायचे. परंतु, त्या लोकांना डरपोक म्हणायला हवे. तोंडावर गोड बोलून मागे चर्चा करत हे लोक आपले मनसुबे साध्य करत होते.”

प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर लॅंगर सध्या समालोचन करताना दिसत आहेत.

(Justin Langer Talk About His Stint With Australia Team)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सची ताकद होणार दुप्पट! आयपीएल 2023पूर्वी आर्चरने सुरू केला सराव

‘आमच्याकडे कितीही पैसे असले तरी आम्ही सूर्यकुमार यादवला बीबीएलमध्ये…’, ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलूचे विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---