पोर्तुगलचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोने रियल माद्रिदकडून ९ वर्षे खेळल्यावर हा क्लब सोडून जुवेंट्सशी का जोडले गेलो याचे स्पष्टीकरण दिले आहे.
रोनाल्डो याने काही दिवसांपूर्वीच जुवेंट्स फुटबॉल क्लबसोबत चार वर्षांसाठी ८८ मिलियन पौंडचा करार केला.
हा करार होण्याच्या काही दिवसांआधीच इटलीतील ट्युरीनमध्ये झालेल्या चॅम्पियन लीगच्या सामन्यात रोनाल्डोने केलेल्या कामगिरीमुळे स्टेडियममधील सगळ्यांनीच त्याच्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवल्या होत्या.
“आधीपासूनच जुवेंट्स हा माझा आवडता क्लब असून मी याचे सामने बघितले आहेत. तसेच क्लबविषयीही सगळेच माहित आहे “, असे रोनाल्डो जुवेंट्स टीव्हीला मुलाखत देताना म्हणाला.
“त्या प्रसंगात चाहत्यांनी केलेल्या कौतुकामुळे तर मी भारावून गेलो”, असेही तो पुढे म्हणाला.
“जुवेंट्समध्ये येण्यासाठी फक्त हे एकच कारण नव्हते. तर बाकीच्या गोष्टीही तेवढ्याच महत्त्वाच्या होत्या. चाहते आणि क्लब तुम्हाला कसे मदत करतात हा वेगळाच मुद्दा आहे”, असेही तो पुढे म्हणाला.
जुवेंट्स स्टेडियममध्ये झालेल्या त्या चॅम्पियन लीगच्या सामन्यात रियलने जुवेंट्सचा ३-० असा पराभव केला होता. यावेळी रोनाल्डोने २ गोल केले होते.
“मला तो दिवस अजूनही आठवतो आहे. ज्यावेळी मी उपांत्यपूर्व फेरीत जुवेंट्स विरुद्ध गोल केले होते आणि स्टेडियममधील सगळेच जण त्यावेळी उभे राहून माझे कौतुक करत होते”,
“यावेळी मला वाटले ही नव्हते की मी या क्लबशी जोडला जाईल. पण जुवेंट्स विरुद्ध खेळताना असे लक्षात आले की येथील चाहतेही क्रिस्तियानो सारखेच आहेत”, असे रोनाल्डो यावेळी म्हणाला.
तसेच पाच वेळा बॅलोन डी ओर हा पुरस्कार जिंकणाऱ्या रोनाल्डोने रियलला सलग तीन वेळा युरोपियन चषक जिंकून दिला आहे.
आज रोनाल्डो जुवेंट्सकडून पहिला सामना खेळणार आहे. तर इटलीच्या सेरी ए स्पर्धेत तो २५ ऑगस्टला होणाऱ्या सामन्यातून पदार्पण करणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–हार्दिक पंड्या अडकणार आयसीसीच्या जाळ्यात!
–प्रीमियर लीग: एनगोलो कांटे आणि हॉर्हीनियोने केलेल्या गोलच्या जोरावर चेल्सीचा विजय