भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (4 डिसेंबर) कॅनबेरा येथील मनुका ओव्हल स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने अर्धशतकी खेळी केली. याबरोबरच त्याने एक खास विक्रमही केली आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून केएल राहुल आणि अनुभवी डावखुरा फलंदाज शिखर धवन सलामीला आले. भारताची सुरुवात खराब झाली आणि अवघ्या 11 धावांवर या संघाला पहिला धक्का बसला. वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने शिखर धवनला (1 धाव) त्रिफळाचित केले.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला कर्णधार विराट कोहलीही काही खास कामगीरी करू शकला नाही. फिरकीपटू मिशेल स्वेप्सनने त्याला 9 धावांवर झेलबाद केले.
केएल राहुलने सांभाळला डाव
मात्र, केएल राहुल खेळपट्टीवर टिकून राहिला. एकेरी-दुहेरी धावा घेत त्याने काही आक्रमक फटकेही खेळले व डाव सांभाळला. त्याने 40 चेंडूत 51 धावा केल्या. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 1 षटकार मारला.
केएल राहुलने नोंदवला विक्रम
महत्वाची बाब म्हणजे या खेळीदरम्यान केएल राहुलने एक विक्रमही नोंदवला. त्याने 39 धावा करताच आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीत 1500 धावांचा पल्ला गाठला. त्याने ही कामगीरी अवघ्या 39 व्या टी20 डावात केली. याचबरोबर टी20 क्रिकेटमध्ये वेगवान 1500 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे.
त्याच्याआधी विराट कोहली, बाबर आझम आणि ऍरॉन फिंच यांनीही 39 डावातच त्यांच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीत 1500 धावांचा टप्पा पार केला होता.
टी20 क्रिकेटमध्ये वेगवान 1500 धावा करणारे फलंदाज
केएल राहुल – 39 डाव
विराट कोहली – 39 डाव
बाबर आझम – 39 डाव
ऍरॉन फिंच -39 डाव
39 टी20 डावांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत राहुल चौथा
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 39 डावांनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली अव्वल क्रमांकावर असून त्याने 1552 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या क्रमांकावर फिंच असून त्याने 1527 धावा केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर बाबार आझम असून त्याने 39 टी20 डावात 1512 धावा केल्या होत्या. या यादीत राहुल चौथ्या क्रमांकावर आला असून त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 39 डावांनंतर 1512 धावा झाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
क्या बात है! यॉर्कर किंग नटराजनचे वनडे पाठोपाठ टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण
चिंता वाढली! क्वारंटाईन नियम तोडलेल्या पाकिस्तान संघाच्या सरावावर बंदी
भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर नटराजनचा भावूक संदेश, म्हणाला…
ट्रेंडिंग लेख –
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ‘त्या’ पाच ऐतिहासिक खेळ्या; एकटा खेळाडू पडला आख्ख्या संघावर भारी
…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली
गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर