पुणे (11 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये आज ‘अ’ गटातील सामन्याचा शेवटचा दिवस आहे. आजचा पहिला सामना अहमदनगर विरुद्ध नांदेड या संघात झाला. अहमदनगर संघ आधीच प्रमोशन फेरी साठी पात्र झाला होता तर नांदेड संघाला रेलीगेशन फेरीत खेळावा लागणार आहे. त्यामुळे हा औपचारिक सामना होता.
अहमदनगर संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत सामन्यात आघाडी मिळवली होती. प्रफुल झवारेच्या चतुरस्त्र चढाया आणि अभिषेक पवारच्या जबरदस्त पकडीच्या जोरावर 11 व्या मिनिटाला अहमदनगर संघाने नांदेड संघाला ऑल आऊट 13-05 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर मध्यंतरापुर्वी पुन्हा एकदा ऑल आऊट करत 24-07 अशी निर्यायक आघाडी मिळवली होती.
अहमदनगर संघाने मध्यंतरा नंतर ही आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवत सामना एकतर्फी केला. अहमदनगर संघाने 53-16 असा एकतर्फी विजय मिळवत गुणतालिकेत पहिला क्रमांक कायम ठेवला. प्रफुल झवारे ने 7 व्या सामन्यात चढाईत 100 गुणांचा पल्ला पार करत स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. अहमदनगर संघाने प्रफुल ने चढाईत 15 गुण मिळवले तर आशिष शिंदे 9 गुण मिळवले. संकेत खलाटे व अभिषेक पवार यांनी हाय फाय पूर्ण करत उत्कृष्ट खेळ दाखवला. नांदेड कडून केवळ आर्यन धावले ने चांगला खेळ केला.
बेस्ट रेडर- प्रफुल झवारे, अहमदनगर
बेस्ट डिफेंडर- संकेत खलाटे, अहमदनगर
कबड्डी का कमाल- अभिषेक पवार, अहमदनगर
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG । ‘लवकर संपव…’, सरफराजला बर्फात फिरायची घाई, इंग्लिश खेळाडूला केलं स्लेज
Lok Sabha Election । ‘मला विश्वास आहे…’, लोकसभा निवडणुकीसाठी इरफानकडून युसूफला आत्मविश्वास वाढवणाऱ्या शुभेच्छा