---Advertisement---

IND vs ENG । ‘लवकर संपव…’, सरफराजला बर्फात फिरायची घाई, इंग्लिश खेळाडूला केलं स्लेज

Sarfaraz Khan Shoaib Bashir
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच संपली. भारतीय संघाने या कसोटी मालिकेत 4-1 अशा फरकाने विजय मिळवला. शेवटच्या चारही सामन्यांमध्ये भारताने बाजी मारली होती. पण मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. मालिकेतील शेवटचा सामना धरमशालामध्ये खेळला गेला. एक डाव आणि 64 धावांनी भारताने हा सामना जिंकला. धरमशाला कसोटीच्याच तिसऱ्या दिवशी सरफराज खान इंग्लंडचा तळातील फलंदाज शोएब बशीर याला स्लेज करताना दिसला.

धरमशाला कसोटी सामना अवघ्या तीन दिवसांमध्ये आटोपला. भारतीय गोलंदाजांनी दोन्ही डावांमध्ये भेदक प्रदर्शन करत इंग्लंडला धूळ चारली. असे असले तरी, खेळल्या गेलेल्या तीन दिवसांमध्ये मैदानात खूपकाही घडले. असाच एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंग्लेंडसाठी धरमशाला कसोटीच्या दुसऱ्या डावात शोएब बशीर (Shoaib Bashir) 10व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याच वेळी खेळपट्टीच्या अगदी जवळ उभा असलेला सरफराज खान (Sarfaraz Khan) त्याला स्लेज करण्याचा प्रयत्न करतो. सरफराज म्हणत आहे की, “संपव लवकर. वरती बर्फ आहे. फिरून येऊ आपण.” गोलंदाजी करणाऱ्या कुलदीप यादव यालाही सरफराजचे शब्द ऐकल्यानंतर हसू आले.

दरम्यान, सोशल मीडियावर सरफराजचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ मजेशीर वाटत असून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या राजकोट कसोटीत सरफराज खान याने कसोटी पदार्पण केले. मोठ्या प्रतिक्षेनंतर सरफराजला अखेर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. पदार्पणाच्या सामन्यातील दोन्ही डावात सरफराजने अर्धशतके ठोकली. धरमशाला कसोटीतही त्याने अर्धशतकी खेळी केली. (Sarfaraz Khan sledged Shoaib Bashir in the Dharamsala Test)

महत्वाच्या बातम्या – 
Lok Sabha Election । ‘मला विश्वास आहे…’, लोकसभा निवडणुकीसाठी इरफानकडून युसूफला आत्मविश्वास वाढवणाऱ्या शुभेच्छा
IPL 2024 । चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, आयपीएल खेळण्यासाठी पंतला ग्रीन सिग्नल?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---