---Advertisement---

टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार का? दुबईत होणार महत्त्वाची बैठक

India Vs Pakistan
---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. मात्र या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार की नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता दुबईत या संदर्भात आयसीसीची बैठक होणार आहे. या बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) भारताची समजूत काढण्याचा प्रयत्न नक्कीच करेल.

पीसीबीनं अलीकडेच मोहसिन नकवी यांची बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. वृत्तानुसार, नकवी बीसीसीआय सचिव जय शाह यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतील. पुढील आठवड्यात दुबईत होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत भारत आणि पाकिस्तान सहभागी होणार आहेत. या बैठकीसाठी बीसीसीआयच्या वतीनं जय शाह जाऊ शकतात. तर पीसीबीच्या वतीनं मोहसीन नकवी बैठकीत सहभागी होणार आहेत. बैठकीत नकवी जय शाह यांच्याशी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बद्दल चर्चा करतील. बीसीसीआयनं टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवावं, अशी पीसीबीची इच्छा आहे.

तसं पाहिलं तर, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्याची शक्यता फारच कमी आहे. जर भारतीय संघ पाकिस्तानात गेला नाही तर हायब्रीड मॉडेलनं चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं जाऊ शकतं. या अंतर्गत काही सामने पाकिस्तानमध्ये खेळले जातील तर भारतीय संघाचे सामने दुसऱ्या देशात आयोजित केले जाऊ शकतात.

टीम इंडिया शेवटची 2008 मध्ये पाकिस्तानला गेली होती. यानंतर भारतीय संघ अजून पाकिस्तानात गेलेला नाही. महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही देशांदरम्यान दीर्घकाळापासून एकही द्विपक्षीय मालिका आयोजित करण्यात आलेली नाही.

बीसीसीआयशी संबंधित एका सूत्रानं सांगितलं की, केवळ भारत सरकारच पाकिस्तानमध्ये खेळण्याचा निर्णय घेऊ शकतं. बीसीसीआय फक्त सरकारचा निर्णय मान्य करेल. मात्र, याबाबत सरकारशी आताच बोलणं घाईचं ठरेल. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, भारतात आयोजित करण्यात आलेल्या 2023 वर्ल्ड कप साठी पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंडविरुद्ध बॅटनं धुमाकूळ घातल्यानंतर सिक्स पॅक ॲब्समध्ये दिसला हा भारतीय खेळाडू, सोशल मीडियावर खळबळ

“…म्हणून भारताविरुद्ध इंग्लंडचा पराभव झाला”, माजी दिग्गज कर्णधारानं स्पष्टच सांगितलं

काश्मीरचा हात नसलेला क्रिकेटर आमिर हुसैन लोन, जो चक्क पायानं करतो गोलंदाजी! सचिन तेंडुलकरही आहे चाहता

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---