पुणे (10 मार्च 2024) – पहिल्या क्रमांकावर असलेल्या अहमदनगर संघाची आजची लढत आठव्या क्रमांकावर असलेल्या जालना संघा विरुद्ध झाली. अहमदनगर संघाने टॉप 4 मध्ये आपला स्थान निश्चित केला होता तर जालना संघ टॉप 4 च्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला होता. अहमदनगर संघाने आज सुद्धा आक्रमकता दाखवत सामन्यात सुरुवातीपासून आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते.
प्रफुल झवारे व आशिष यादव यांच्या चतुरस्त्र चढायांनी जालना संघाला 7 व्या मिनिटाला ऑल आऊट करत 10-01 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर अहमदनगर संघाच्या चढाईपटूंनी आक्रमक खेळ कायम ठेवत मध्यंतरा पर्यत 32-07 अशी आघाडी मिळवली होती. अहमदनगर संघाच्या चढाईपटूं सोबत बचावपटूंनी सुद्धा गुण मिळवण्याची संधी सोडली नाही. अहमदनगरच्या प्रफुल झवारे व आशिष यादव यांनी सुपर टेन पूर्ण केला.
संपूर्ण सामन्यात अहमदनगर संघाने जालना संघाला 6 वेळ ऑल आऊट करत अक्षरशः हतबल केले. अहमदनगर संघाने 69-13 असा 56 गुणांच्या मोठ्या फरकाने स्पर्धेतील मोठा विजय मिळवला. अहमदनगर कडून प्रफुल झवारे ने चढाईत सर्वाधिक 19 गुण तर आशिष यादव ने 11 गुण मिळवले. तर संभाजी वाबले ने 7 व प्रसाद गोरे ने 4 पकडीत गुण मिळवले.
बेस्ट रेडर- प्रफुल झवारे, अहमदनगर
बेस्ट डिफेंडर- संभाजी वाबले, अहमदनगर
कबड्डी का कमाल- प्रसाद गोरे, अहमदनगर
महत्वाच्या बातम्या –
अहमदनगर, बीड संघाचा प्रमोशन फेरीत प्रवेश निश्चित
धुळे संघावर विजय मिळवत रायगड संघ प्रमोशन फेरीच्या शर्यतीत कायम