पुणे (10 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 चा आज सहाव्या दिवशी रायगड विरुद्ध धुळे यांच्यात लढत झाली. रायगड संघ 14 गुणांसह 5 व्या क्रमांकावर होता. तर धुळे संघ 11 गुणांसह 7 व्या क्रमांकावर होता. पराभूत होणारा संघ टॉप 4 च्या शर्यतीतून बाहेर जाणार हे जवळपास निश्चित होते त्यामुळे दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्वपूर्ण लढत होती. धुळे संघाच्या अक्षय पाटील ने सलग दोन चढायांमध्ये गुण मिळवत धुळे संघाला चांगली सुरुवात करून दिली.
मध्यंतरा पर्यत सामना अत्यंत चुरशीचा सुरू होता. कधी धुळे संघ आघाडीवर तर कधी रायगड संघ आघाडी घेत होता. तर खूप वेळ सामना बरोबरीत राहत होता. धुळे कडून अक्षय पाटील व जैवर्धन ने गुण मिळवले. रायगड कडून आज पुन्हा एकदा राज जंगम ने अष्टपैलू खेळीचे प्रदर्शन केलं. मध्यंतरा नंतर खेळ सुरू झाला तेव्हा रायगड संघाने धुळेच्या शिल्लक असलेल्या एका खेळाडूंवर बाद करत लोन पाडला. निखिल शिर्के व राज जंगम च्या आक्रमक खेळीने धुळे संघाला पुन्हा एकदा ऑल आऊट करत सामन्यावर पकड मजबुत केली.
निखिल शिर्केच्या सुपर टेन संघ अष्टपैलू खेळीने रायगड संघाने 45-21 असा विजय मिळवत टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी आपल्या आशा कायम ठेवल्या. निखिल शिर्के सोबत राज जंगम ने सुद्धा 9 गुणांची अष्टपैलू खेळी केली. तर राज मोरे ने पकडीत 4 तर अनुराग सिंग ने चढाईत 6 गुण मिळवत मोलाची भूमिका निभावली. धुळे कडून अक्षय पाटील आज स्पर्धेत चढाईत 50 गुणांचा पल्ला पार केला.
बेस्ट रेडर- निखिल शिर्के, रायगड
बेस्ट डिफेंडर- राज मोरे, रायगड
कबड्डी का कमाल- जैवर्धन गिरासे, धुळे
महत्वाच्या बातम्या –
मालिका विजयानंतर श्रीलंका संघाचं विचित्र सेलिब्रेशन, बांग्लादेशला करून दिली ‘टाईम आऊट’ वादाची आठवण
WPL 2024 : RCB विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून घेतला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय