पुणे (10 मार्च 2024) – आज सहाव्या दिवशी पाचव्या क्रमांकावर असलेल्या मुंबई शहर विरुद्ध सहाव्या क्रमांकावर असलेल्या नांदेड संघात महत्वपूर्ण लढत बघायला मिळाली. दोन्ही संघ टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. पराभूत होणारा संघ टॉप 4 च्या शर्यतीतून बाहेर जाणार हे जवळपास निश्चित होते त्यामुळे दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्वपूर्ण लढत होती.
दोन्ही संघानी पहिल्या चढाईत 1-1 गुण मिळवत सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र दोन्ही संघानी सावध खेळ केला. मुंबई शहरच्या राज आचार्य व अनिकेत मस्तके ने चपळाईने चढाईत गुण मिळवत संघाला आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या आठव्या मिनिटाला नांदेड संघाला ऑल आऊट करत मुंबई शहर ने 10-01 अशी आघाडी मिळवली. मध्यंतरा पूर्वी नांदेड संघाला पुन्हा एकदा ऑल आऊट करत मुंबई शहर ने 24-05 अशी 18 गुणांची आघाडी मिळवली होती.
मुंबई शहर ने मध्यंतरा नंतर आपला आक्रमक खेळ सुरू ठेवत सामना आपल्या बाजूने केला. राज आचार्य व अनिकेत मस्तके च्या सुपर टेन च्या खेळीने मुंबई शहर ने 47-22 असा विजय मिळवला. तर रुपेश साळुंखे ने हाय फाय पूर्ण करत बचवाफळीत महत्वपूर्ण भूमिका निभावली. या विजयासह मुंबई शहर ने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. (With the third win, Mumbai city jumped to the third position in the points table)
बेस्ट रेडर- अनिकेत मस्तके, मुंबई शहर
बेस्ट डिफेंडर- रुपेश साळुंखे, मुंबई शहर
कबड्डी का कमाल- अनिकेत मस्तके, मुंबई शहर
महत्वाच्या बातम्या –
WPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर एका धावेनी विजय, टॉप थ्रीची चुरस वाढली
इंग्लंडविरुद्ध बॅटनं धुमाकूळ घातल्यानंतर सिक्स पॅक ॲब्समध्ये दिसला हा भारतीय खेळाडू, सोशल मीडियावर खळबळ