पुणे (10 मार्च 2024) – आजची शेवटची लढत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बीड विरुद्ध पाचव्या क्रमांकावर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात महत्वपूर्ण लढत झाली. बीड संघाने टॉप 4 मध्ये आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. रत्नागिरी संघासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा होता. दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली होती. पहिल्या सहा मिनिटाच्या खेळी नंतर 4-4 असा सामना बरोबरीत होता. बीडच्या शंकर मेघाने व रत्नागिरीच्या वेद पाटील ने प्रत्येकी 2-2 गुण मिळवले होते.
राहुल टेके सलग दोन चढाईत 2 गुण मिळवले तर रत्नागिरीच्या वेद पाटील व श्रेयस शिंदेच्या बीड च्या बचावपटूंनी पकडी करत आघाडी मिळवली. रत्नागिरीच्या आविष्कार पालकर ने सुपर रेड करत पुन्हा एकदा सामन्यात रंगत आणली. रत्नागिरी संघाने शंकर मेघाने व राहुल टेके ची पकड करत आघाडी मिळवली. जिथे रत्नागिरी संघावर ऑल आऊट ची वेळ आली असताना त्यांनी उलटफेर करत बीड संघाला ऑल आऊट 15-09 अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली.
आविष्कार पालकरच्या अष्टपैलू खेळीने सामन्यात चांगलीच रंगत आणली. मध्यंतराला रत्नागिरी संघाने 19-12 अशी आघाडी मिळवली होती. रत्नागिरीच्या अभिषेक शिंदे ने सुद्धा मध्यंतरापूर्वी महत्वपूर्ण 5 गुण मिळवले. मध्यंतरा नंतर अभिषेक शिंदे एका चढाईत 2 गुण मिळवत आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर वेद पाटील ने बीड संघाला ऑल आऊट करत रत्नागिरी संघाची आघाडी वाढवली. अखेर रत्नागिरी संघाने सलग दोन टाय सामन्या नंतर सांघिक खेळाच्या जोरावर 38-19 असा महत्वपूर्ण विजय मिळवला.
बेस्ट रेडर- अभिषेक शिंदे, रत्नागिरी
बेस्ट डिफेंडर- आविष्कार पालकर, रत्नागिरी
कबड्डी का कमाल- आविष्कार पालकर, रत्नागिरी
महत्वाच्या बातम्या –
इंग्लंडविरुद्ध बॅटनं धुमाकूळ घातल्यानंतर सिक्स पॅक ॲब्समध्ये दिसला हा भारतीय खेळाडू, सोशल मीडियावर खळबळ
WPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर एका धावेनी विजय, टॉप थ्रीची चुरस वाढली