---Advertisement---

“रोहित शर्मानं 2025 मध्ये चेन्नईकडून खेळावं”, माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्यानं खळबळ

Rohit Sharma Mumbai Indians
---Advertisement---

रोहित शर्मा गेल्या 13 वर्षांपासून मुंबई इंडिसन्समध्ये आहे. त्यानं 2013 मध्ये संघाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर त्यानं मुंबईला आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम बनवली आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबईनं 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये विजेतेपद पटकावलं.

रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स हे समीकरण फार घट्ट आहे. चाहते रोहितला मुंबईशिवाय दुसऱ्या कोणत्याच टीमकडून खेळताना पाहू शकत नाहीत. यावर्षीच्या आयपीएलसाठी संघानं रोहितच्या ऐवजी हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली. या निर्णयाविरोधात सोशल मीडियावर मोठा विरोध पाहायला मिळाला. चाहते रोहितला पुन्हा कर्णधार करण्याची मागणी सातत्यानं करत आहेत.

या पार्श्वभूमीवर आता एका माजी भारतीय खेळाडूनं मोठं वक्तव्य केलं. त्यानं रोहितनं चक्क चेन्नई सुपर किंग्जकडून खेळावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. चेन्नई आणि मुंबईचा माजी खेळाडू अंबाती रायुडूनं हे वक्तव्य केलं आहे. रायुडू म्हणाला, “रोहित शर्मानं 2025 मध्ये सीएसकेकडून खेळावं अशी माझी इच्छा आहे. जर एमएस (महेंद्रसिंह धोनी) निवृत्त झाला तर रोहित संघाचं नेतृत्वही करू शकेल”. न्यूज 24 नं याबाबतचं वृत्त दिलंय.

रायुडूच्या या वक्तव्यावर चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. काही चाहत्यांची धोनी आणि रोहितनं चेन्नईमध्ये एकत्र खेळावं अशी इच्छा आहे. तर काही चाहत्यांचा याला सपशेल विरोध आहे. त्यांच्या मते रोहितनं मुंबईतच राहुन निवृत्ती घ्यावी.

महत्त्वाच्या बातम्या-

काश्मीरचा हात नसलेला क्रिकेटर आमिर हुसैन लोन, जो चक्क पायानं करतो गोलंदाजी! सचिन तेंडुलकरही आहे चाहता

हरमनप्रीतच्या धडाकेबाज खेळीनंतर रेफरी लागले बॅट चेक करायला! जाणून घ्या मैदानावर काय घडलं

भारताचा ‘हा’ माजी खेळाडू पश्चिम बंगालमधून लोकसभेच्या रिंगणात, 2011 च्या विश्वचषकात बजावली होती महत्त्वाची भूमिका

 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---