भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या चर्चेत आहे. इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगामात रिषभ पंत पुनरागमन करणार आहे, अशी दाट शक्यता माध्यमांमध्ये वर्तवली जात आहे. आगामी आयपीएल हंगामासाठी पंतला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून फिटनेस सर्टिफिकेट मिळाल्याचेही सांगितले जात आहे. पंत डिसेबंर 2022 मध्ये झालेल्या कार अपघातानंतर प्रोफेशनल क्रिकेट खेळला नाहीये.
इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) हंगाम 22 मार्च रोजी सुरू होणार आहे. रिषभ पंत (Rishabh Pant) आगामी आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नेतृत्व करताना दिसेल, असे सांगितले जात आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार पंतने चालू आठवड्यातच फिटनेस चाचणी पार केली आहे. आता दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे. सध्या पंत आयपीएलच्या आगामी हंगामासाठी ऍड शूट करत आहे. पण लवकरच तो विशाखापट्टणममध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये सामील होईल.
माध्यमांमध्ये, पंत आगामी आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा भाग असेल, असे सांगितले जात आहे. पण तो संघासाठी नक्की कोणती भूमिका पार पाडणार, याविषयी अद्याप स्पष्टता आली नाहीये. संघाचे कर्णधारपद त्याच्याकडे सोपवले, तरी फ्रँचायझीला अडचणींचा समना करावा लागू शकतो. कारण भारतीय संघासाठी यष्टीरक्षक फलंदाज महत्वाचा आहे. अशात बीसीसीआय पंतच्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीसाठी त्याच्यावर कुठलाच दबाव टाकू इच्छित नाहीये.
सौरव गांगुली याने याविषयी काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, “आधी पंतला 5 मार्चला फिटनेस सिद्ध करू द्या. त्यानंतर कर्णधारपद आणि बदली खेळाडूंविषयी बोलता येईल. आम्ही त्यांच्यासोबत सावधगीरीने वागत आहोत. कारण त्याच्यापुढे खूप मोठी कारकीर्द आहे. आम्ही उत्साहात त्याच्यावर जास्त दबाव टाकू शकत नाही. पंत कशा पद्धतीने प्रतिसाद देतो, हे आम्ही पाहू. एनसीएमधून परवानगी मिळाल्यानंतर तो कॅम्पमध्ये सामील होईल. प्रत्येक सामन्यातील त्याचे प्रदर्शन पाहिले जाईल. आम्ही आताच काही भविष्यवाणी करू शकत नाही.”
दरम्यान, पंत अपघातानंतर काहीच महिन्यांमध्ये सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झाला होता. मागच्या एका वर्षामध्ये त्याने वेळोवेळी आपल्या फिटनेसविषयी माहिती सर्वांनी दिली. मागच्या काही महिन्यात यष्टीरक्षक फलंदाज खेळण्यासाठी फिट दिसत आहे. तो जिममध्ये दिवसातील बहुतांश वेळ घालवत आहे. (Important information about Rishabh Pant’s fitness ahead of IPL 2024)
महत्वाच्या बातम्या –
प्रमोशन फेरीसाठी 2 संघाचा प्रवेश निश्चित, तर उर्वरित 2 जागांसाठी 3 संघात चुरस
तिसऱ्या विजयासह रत्नागिरी संघाचा प्रमोशन फेरीतील प्रवेश निश्चित