पुणे (9 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीजचा आज पाचव्या दिवशी अहमदनगर विरुद्ध धुळे या लढतीने सुरुवात झाली. अहमदनगर संघाला सलग तीन विजया नंतर काळ झालेल्या लढतीत सामना बरोबरीत ठेवण्यात समाधान मानावा लागला होता. तर धुळे संघाने नांदेड संघावर रोमहर्षक विजय मिळवला होता. अहमदनगर संघाने आज पुन्हा एकदा जोरदार सुरुवात केली.
प्रफुल झवारे च्या आक्रमक चढाया आणि बचावपटूंनी केलेल्या जबरदस्त पकडीच्या जोरावर अहमदनगर संघाने पाचव्या मिनिटाला धुळे संघाला ऑल आऊट करत 9-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर सुद्धा ह्याच आक्रमक पवित्रा कायम ठेवत अहमदनगर संघाने धुळे संघाला 10 व्या मिनिटाला पुन्हा एकदा ऑल आऊट करत सामन्यावर पकड मजबूत केली. प्रफुल झवारे ने मध्यंतरा पूर्वीच सुपर टेन पूर्ण केला. संकेत खलाटे ने उत्कृष्ट पकडी केल्या.
अहमदनगर संघाने मध्यंतरापूर्वी तिसऱ्यांदा धुळे संघाला ऑल आऊट करत 32-04 अशी निर्यायक आघाडी मिळवली होती. मध्यंतरा नंतर सुद्धा अहमदनगरच्या खेळाडूंनी धुळे संघाला 1-1 गुण मिळवण्यासाठी संघर्ष करायला लावला. संपूर्ण सामन्यात अहमदनगर संघाने धुळे संघाला 6 वेळा ऑल आऊट सामना 62-09 असा मोठ्या फरकाने जिंकला. अहमदनगर संघाचा हा स्पर्धेतील चौथा विजय ठरला. प्रफुल झवारे ने या सामन्यात या स्पर्धेत एका सामन्यात सर्वाधिक गुण मिळवण्याचा रेकॉर्ड केला. त्याने 23 गुणांसह चढाईत 50 गुणांचा टप्पा पार केला.
बेस्ट रेडर – प्रफुल झवारे, अहमदनगर
बेस्ट डिफेंडर- संकेत खलाटे, अहमदनगर
कबड्डी का कमाल- अभिषेक पवार, अहमदनगर
महत्वाच्या बातम्या –
रत्नागिरी विरुद्ध अहमदनगर सामना अंतिम चढाईत बरोबरीत राहिला
IPL 2024 : आयपीएलमधील 5 स्टार भारतीय खेळाडू जे कधीच आपल्या घरच्या संघाकडून खेळले नाहीत