पुणे (6 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये दुसऱ्या दिवसाचा तिसरा सामना नांदेड विरुद्ध बीड यांच्यात झाली. दोन्ही संघांनी पहिल्या सामन्यात विजय मिळवले होते त्यामुळे सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक होते. दोन्ही संघांनी सावध सुरू केली होती. 3-3 अश्या बरोबरी नंतर राहुल टेके चतुरस्त्र चढाया करत गुण मिळवत नांदेड संघाला ऑल आऊट केले. संदेश देशमुख ने उत्कृष्ट पकडी करत संघाची आघाडी वाढवली.
बीड संघाने मध्यंतरा पर्यत 23-15 अशी महत्वपूर्ण आघाडी मिळवली होती. त्यानंतर ही त्यांनी आपला आक्रमक खेळ सुरू ठेवत आपली आघाडी वाढवली. नांदेड कडून पंकज राठोड व शक्ती शेडमके ने चढाईत प्रत्येकी 9 गुण मिळवत बीड संघाला चांगला प्रतिकार दिला. तर राहुल टेके ला आज संपूर्ण संघाने चांगली साथ दिली.
बीड संघाने 45-30 असा नांदेड संघाला पराभूत करत सलग दुसरा विजय मिळवला. राहुल टेके ने अष्टपैलू खेळ करत एकूण 14 गुण मिळवले तर बदली खेळाडू म्हणून आलेल्या सागर गगदाई ने 6 एकूण मिळवत चांगली साथ दिली. संदेश देशमुख ने सर्वाधिक पकडीत 4 गुण मिळवले. तर तेजस झगडे व आकाश राठोड यांनी पकडीत प्रत्येकी 3 गुण मिळवले. (K. M. P. Yuva Kabaddi series Beed district’s second straight win in)
बेस्ट रेडर- राहुल टेके, बीड
बेस्ट डिफेंडर- संदेश देशमुख, बीड
कबड्डी का कमाल- सागर गगदाई
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG : जयस्वालने विराटला अवघ्या 7 महिन्यांत टाकलं मागं; इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत केला ‘हा’ मोठा विक्रम
IND vs ENG । पहिल्या डावात कुलदीपच भारताच सर्वोत्तम गोलंदाज, मैदानाबाहेर जाताना अश्विनने जिंकलं मन