---Advertisement---

‘युवांमध्ये नाही तर चावला-जाधवसारख्या वयस्करांमध्ये कसली प्रतिभा,’ माजी क्रिकेटरची धोनीवर टीका

---Advertisement---

सोमवारी (१९ ऑक्टोबर) अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला ७ विकेट्सने पराभूत केले. हा चेन्नईचा या हंगामातील ७ वा पराजय होता. चेन्नईच्या या वाईट प्रदर्शनानंतर भातीय संघाचे माजी कर्णधार के श्रीकांत यांनी एमएस धोनीवर निशाणा साधला आहे.

राजस्थानविरुद्धचा सामना झाल्यानंतर बोलताना धोनी म्हणाला की, पाहावे लागेल आमच्या प्रक्रियेत काय चूक झाली. परिणाम हा प्रक्रियेचा फक्त एक भाग आहे. पण जर आम्ही मूळ प्रक्रियेवर लक्ष दिले, तर संघावर जास्त दबाव येणार नाही. पण श्रीकांत धोनीच्या या वक्तव्याशी संतुष्ट असल्याचे दिसून आले नाहीत.

या संदर्भात स्टार स्पोर्ट्स तमिळशी संवाद साधताना ते म्हणाले की, “धोनी ज्या संघ निवड प्रक्रियेविषयी बोलत आहे त्याला कसलाही अर्थ नाही. त्याच्या संघातील भारतीय खेळाडूंना दबाव सहन करता येत नाहीये. रायडू थोडाफार खेळत आहे. पण पीयूष चावला, केदार जाधव आणि रवींद्र जडेजा हे चांगले प्रदर्शन करत नाहीत.”

“धोनीला एन जगदीशनसारख्या खेळाडूमध्ये स्पार्क दिसला नाही. मग पीयूष चावला आणि केदार जाधवमध्ये असा कोणता स्पार्क होता, ज्यामुळे धोनीने प्रत्येक सामन्यात त्या दोघांना संधी दिली. चावला तेव्हा आक्रमक गोलंदाजी करतो, जेव्हा सामना संपायला येतो. जाधवविषयी बोलायचं झालं तर, त्याला साधं मैदानावर चालत जाण्यासाठी स्कूटरची गरज असते. धोनी मोठा खेळाडू आहे, पण त्याने यंदा आयपीएलमध्ये घेतलेले निर्णय मला अर्थहीन वाटले,” असे पुढे बोलताना श्रीकांत यांनी म्हटले.

श्रीकांत हे आयपीएलच्या पहिल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघाचे ब्रँड ऍम्बेसेडर होते. तसेच त्यांनी १९८१ ते १९९२ दरम्यान भारतीय कसोटी आणि वनडे संघाचे प्रतिनिधित्त्व केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

क्रिकेटमधील राजा माणूस! राजस्थानचा हुकमी एक्का जॉस बटलरला धोनीकडून खास भेट

‘मिस्ट्री गर्ल’! पंजाब वि. मुंबई सामन्यात व्हायरल झालेली मुलगी आहे तरी कोण? स्वत: वर बनलेले मिम्स केले शेअर

‘अजूनही सीएसकेसाठी प्लेऑफचे दरवाजे उघडे,’ माजी क्रिकेटरचे मोठे भाष्य

ट्रेंडिंग लेख-

सचिनची विकेट गेल्यावर सेहवाग अंपायर शेजारी जाऊन बसला, असे काय घडले होते बेंगलोर कसोटीत?

ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १: सेहवाग रडत होता तर जॉन राईट शेजारच्या खोलीत सिगरेट ओढत होते…

सचिन तंबूत परतलेला असताना अझर, सिद्धूने केलेली ती खेळी वर्षानुवर्षे लक्षात ठेवली गेली

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---