---Advertisement---

PAK vs NZ: ‘कबड्डी-कबड्डी’, न्यूझीलंडविरुद्ध शाॅर्ट धाव घेतल्यामुळे धवनने रिझवानची उडवली खिल्ली

Mohammad-Rizwan
---Advertisement---

New Zealand vs Pakistan: न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना बुधवारी (१७ जानेवारी) ड्युनेडिन येथे खेळला गेला, ज्यामध्ये पाकिस्तानचा 45 धावांनी पराभव झाला. या सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या फलंदाजीवेळी एक मजेदार घटना दिसली, ज्यामध्ये पाकिस्तानचा उपकर्णधार मोहम्मद रिझवान याने हातमोजे घालून मैदानाला स्पर्श करून धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

त्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी 225 धावांचे लक्ष्य दिले होते. पाचव्या षटकानंतर पाकिस्तानने 1 विकेट्स गमावून 42 धावा केल्या होत्या. किवी संघासाठी मॅट हेन्री याने डावातील सहावे षटक टाकले. रिझवानने (Mohammad Rizwan) ओव्हरचा पाचवा चेंडू डीप मिड-विकेटच्या दिशेने खेळला, पण अचानक त्याचा तोल गेला. यामुळे त्याची बॅट हातातून खाली पडली. त्यानंतर रिझवान बॅटशिवाय धावा काढण्यासाठी धावू लागला. नॉन-स्ट्रायकरच्या रेषेला हातमोजे लावून त्याने पहिली धाव पूर्ण केली आणि नंतर दुसऱ्या धावेसाठी ढाय मारली. विकेट वाचवण्याच्या प्रयत्नात रिझवानने मोठी यावेळी मोठी चूक केली होती.

वास्तविक, पहिली धाव पूर्ण करताना, रिजवानने हातमोजे घालून जमिनीला स्पर्श केला होता, पण रेषेला स्पर्श केला नाही. या कारणास्तव अंपायरने त्याला शॉर्ट रन घोषित केले. रिप्लेमध्ये त्याची चूक पाहून पाकिस्तानच्या यष्टीरक्षक फलंदाजालाही हसू आवरता आले नाही.

अनुभवी डावखुरा फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) त्याच्या ट्विटर हँडलवर हातमोजे घालून जमिनीला स्पर्श करताना रिजवानचे काही फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “कबड्डी-कबड्डी-कबड्डी”

कबड्डीच्या खेळात एक गुण मिळविण्यासाठी रेडरला विरोधी खेळाडूंना स्पर्श करून मैदानाच्या मधल्या रेषेला स्पर्श करावा लागतो. असेच उदाहरण देत गब्बरने रिजवानची खिल्ली उडवली आहे. (Kabaddi-Kabaddi Dhawan mocks Rizwan for short run against New Zealand)

हेही वाचा

पाकिस्तानात पराभवाचे पडसाद, आधी प्रशिक्षकांचा राजीनामा, आता क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी सोडले पद
उमेश यादवची घातक गोलंदाजी, तिलक वर्माची झंझावाती खेळी, रोहित शर्माचा 5 विकेट्स घेत रणजीत धुमाकूळ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---