---Advertisement---

कबड्डी मास्टर्स दुबई 2018: असा आहे पाकिस्तानचा संघ

On: मंगळवार, जून 19, 2018 8:38 AM
---Advertisement---

कबड्डी मास्टर्स दुबई 2018 स्पर्धा जशीजशी जवळ येत आहे, तशी सर्वांची उत्सुकता वाढत आहे. त्यात सलामीचा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान असा पारंपारीक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणार आहे.

कबड्डीमध्ये भारतानंतर चांगला खेळणारा संघ म्हणून पाकिस्तानकडे पाहिले जाते. त्यामुळे या स्पर्धेतही त्यांच्याकडून उत्तम खेळाची अपेक्षा असणार आहे.

तसेच भारताप्रमाणेच पाकिस्तानसाठीही आॅगस्टमध्ये होणाऱ्या एशियन गेम्सच्या दृष्टीने दुबई  मास्टर्स स्पर्धा महत्त्वाची आहे. कारण या स्पर्धेत भारत, इराण आणि दक्षिण कोरिया हे आशियाई संघ खेळणार आहेत.

कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेसाठी पाकिस्तानचा समावेश भारत आणि केनियासह अ गटात करण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या संघात चांगले तरूण खेळाडू आहेत. तसेच त्यांची बचाव फळी भक्कम आहे. त्यामुळे पहिल्याच सामन्यात भारताचे रेडर्स विरुद्ध पाकिस्तानची बचावफळी असा सामना पहायला मिळू शकतो.

भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये 2017च्या आशियाई चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत लढत झाली होती. यामध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत करून आशियाई चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले होते.

कब्बडी मास्टर्स दुबई स्पर्धेत प्रत्येक संघ आपल्या गटातील प्रत्येक संघाशी साखळी फेरीत प्रत्येकी दोन सामने खेळेल. त्यानंतर प्रत्येक गटातील पहिले दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

असा आहे पाकिस्तानचा संघ: नासीर अली, वकार अली, मुदस्सर अली, कासीर अब्बास, काशिफ रजाक, मोहम्मद नदीम, सज्जाद शौकत, मुहम्मद इमरान, मोहम्मद सफियन, आबिद हुसैन, अखिल हुसैन, वासिम सज्जद, मुहम्मद निसार, मुजम्मल हुसेन.

महत्त्वाच्या बातम्या:

दादा संघाची गेल्या ३४ वर्षातील आयसीसी क्रमवारीतील सर्वात निचांकी घसरण तर टीम इंडिया

केसाने कापला होता या दिग्गज भारतीय फलंदाजाचा गळा!

रशियातील फिफा विश्वचषकासाठी या भारतीयाने काढले तब्बल 15 लाखांचे कर्ज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment