कबड्डी मास्टर्स २०१८ स्पर्धेत आज शुक्रवार दि. २९ जूनला उपांत्य फेरीचा पहिला सामना विश्वविजेता भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात होणार आहे.
अ गटातील चारही सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत पोहचलेल्या भारतीय संघाला ब गटात दुसऱ्या स्थानी राहिलेल्या दक्षिण कोरियाशी सामना करावा लागणार आहे.
या सामन्यात अपेक्षेप्रमाणे विश्ववविजेत्या भारतीय संघाचे पारडे जड रहाणार आहे. सध्या भारतीय कर्णधार अजय ठाकूरसह रीशांक देवाडीगा, मोनू गोयत आणि भारतीय युवा खेळाडू भरात असल्याने दक्षिण कोरियाचा भारताशी लढताना कस लागणार आहे.
असे असले तरी भारतीय संघाने दक्षिण कोरियाल दुबळे लेखून चालणार नाही.
जॅन कुन लीच्या नेतृत्त्वाखालील दक्षिण कोरियन संघाला त्यांचा रेडींगमधील वेग आणि बचावफळीवर अवलंबून रहावे लागणार आहे.
या सामन्यात बलाढ्य भारतीय संघाचे पारडे जड दिसत असले तरी भारताला दक्षिण कोरियाकडून चांगली टक्कर मिळू शकते.
किती वाजता होणार हा सामना?
उपांत्य फेरीचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध इराण ८ वाजता होणार असून दुसरा सामना हा भारत विरुद्ध कोरिया रात्री ९ वाजता होणार आहे.
कोणत्या चॅनेलवर पाहता येणार हा सामना?
कबड्डीप्रेमी या सामन्याचा आनंद स्टार स्पोर्ट्स २ वर घेऊ शकतात. आज उपांत्यफेरीचे दोन सामने तर उद्या अंतिम सामना या चॅनेलवर दाखवला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-राष्ट्रकुृलविजेत्या महाराष्ट्रीयन खेळाडूंवर महाराष्ट्र सरकारचा बक्षिसांचा वर्षाव
-विंबल्डनचे चाहते आहात? मग या गोष्टी माहित असायलाच हव्यात..