कबड्डी
प्रो कबड्डी: वॉरियर्स आणि योद्धा आमने सामने
प्रो कबड्डीमध्ये आज दुसरा सामना बेंगाल वॉरियर्स आणि यु.पी. योद्धा यांच्यात होणार आहे. झोन बी मधील हे दोन संघ या मोसमात दोन वेळेस आपसात भिडले....
पटणा पायरेट्स आणि बंगाल वोरीयर्स यांच्यात होणार बंगाल लेगचा पहिला सामना !
नेताजी सुभाष चंद्र बोस इंडोर स्टेडियम, कोलकाता येथे आज बंगाल वोरीयर्स आणि पटणा पायरेट्स यांच्यात कोलकाता लेगचा पहिला सामना होणार आहे. बंगाल पुढे मागील दोन....
हरयाणा स्टीलर्स करणार का पराभवाची परतफेड?
प्रो कबड्डीमध्ये आज पहिला सामना यु मुंबा आणि हरियाणा स्टीलर्स या दोन तोलामोलाच्या संघात आहे. या मोसमाच्या सुरुवातीला हे दोन संघ आपसात भिडले होते. त्या....
प्रो कबड्डी: कोण ठरणार या मोसमात १०० गुण मिळवणारा पहिला खेळाडू?
प्रो कबड्डीच्या यंदाच्या मोसमात रेडर्सचा बोलबाला आहे. काही संघ फक्त रेडींगच्या जोरावर एकतर्फी सामने संघासाठी जिंकून देत आहेत. याला अपवाद फक्त हरयाणा स्टीलर्स आणि गुजरात....
प्रो कबड्डी: २९० सामन्यांचा इतिहास असणाऱ्या प्रो कबड्डीमध्ये पहिल्यांदाच अशी वेळ आली
प्रो कबड्डीमध्ये आपण आपल्या आवडत्या संघाला सामना जिंकताना तर कधी गमावताना देखील पहिले आहे. कधी आपल्या आवडत्या संघाचा सामना बरोबरीत सुटताना देखील आपण पाहिला असेल.....
आज गुजरात विरुद्ध मुंबई आमने-सामने
प्रो कबड्डीमध्ये आज ‘झोन ए’ मधील सामन्यात यु मुंबा आणि गुजरात फॉरचून जायन्टस आपसात भिडणार आहेत. या दोन्ही संघात झालेल्या सामन्यात गुजरातने यु मुंबाला पराभूत....
यू पी योद्धाज भिडणार बेंगलुरू बुल्स बरोबर !
आज प्रो कबड्डीच्या ५व्या मोसमातील ५१वा सामना नितीन तोमरच्या यू पी योद्धाज आणि रोहित कुमारच्या बेंगलुरू बुल्स यांच्यात होणार आहे. योद्धजला त्यांच्या घरच्या मैदानावरील शेवटच्या....
पुणेरी पलटणच्या टीमने घेतले गणपती बाप्पाचे आशीर्वाद
यु मुंबा ला हरवल्यावर पुणेरी पलटण ने पुण्यातील प्रसिद्ध कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन संध्याकाळच्या आरतीत सहभाग घेतला. संघातील प्रमुख खेळाडू दीपक हुडा, संदीप नरवाल, धर्मराज चेलारथन, राजेश मोंडल या वेळी उपस्थित होते पुणे २८ ऑगस्ट २०१७: यु मुंबाला हरवल्यावर पुणेरी पलटण चा संघ आणि व्यवस्थापनाने पुण्यातील मनाच्या पहिल्या कसबा गणपतीचे आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीचेदर्शन घेतले आणि संध्याकाळच्या आरतीला उपस्थिती लावली. या प्रसंगी संघाचा कर्णधार दीपक हुडा, मुख्य प्रशिक्षक बी सी रमेश, प्रमुख खेळाडू संदीप नरवाल, धर्मराजचेलारथन, राजेश मोंडल या वेळी उपस्थित होते. खेळाडूंनी आरती नंतर भक्तांना प्रसादाचे वाटप केले. या प्रसंगी बोलताना दीपक हुडा पुणेरी पलटण कर्णधार म्हणाला, ” गणपतीमध्ये बाप्पाचे आशीर्वाद मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. बाप्पा हा विद्येचीदेवता आणि अडथळ्यांचा संहारक आहे. आज आम्ही संपूर्ण संघाने आमच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी बाप्पाला साकडे घातले असून विजयासाठी आम्हाला शक्तीआणि बुद्धी मागितली आहे. या प्रसंगी मी सर्व गणेश भक्तांना विनंती करतो कि आपल्या लाडक्या बाप्पाचा हा उत्सव इको फ्रेंडली पद्धतीने साजरा करा आणि पर्यावरणाचा ह्रासथांबवा.” कैलाश कांडपाल, सीईओ पुणेरी पलटण म्हणाले, ” कसबा गणपती हि पुण्याची ग्रामदेवता असून दगडूशेठगणपती हे प्रमुख मंडळ आहे. दोन्ही बाप्पाच्या दर्शनाने आमच्यासंघाला उरलेले सामने खेळण्यासाठी एक नवीन ऊर्जा आणि ताकद मिळाली आहे. ज्याप्रमाणे कबड्डी हा भारतातील प्राचीन खेळ आहे त्याप्रमाणे सार्वजनिक गणेश उत्सवालादेखील १२५ वर्षांची पार्शवभूमी आहे. आणि यावर्षी हा क्षण अनुभवताना पुणेरी पलटण संघाला एक वेगळाच आनंद झाला आहे. ज्या प्रमाणे कसबा गणपती हा मनाचा पहिलागणपती आहे त्या बाप्पाचे आशीर्वाद घेऊन आता आम्ही सुद्धा या हंगामामध्ये नो. १ राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. गणपती मंडळांना भेट दिली असताना दोन्ही मंडळांच्या ट्रस्टींशी खेळाडूंनी संवाद साधला आणि दोन्ही मंडळांनी खेळाडूंचा श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार केला. दोन्हीट्रस्टनि पुणेरी पलटणच्या संघाला भविष्यातील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या. आरतीला कबड्डी प्रेमींनी हजेरी लावली आणि बरेच प्रशंसक खेळाडूंसोबत फोटोस काढत होते.
राहुल चौधरी विरुद्ध विशेष रणनीती- पुणेरी पलटण प्रशिक्षक बी.सी.रमेश
प्रो कबड्डीमध्ये पुणेरी पलटण यंदा विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. मागील सामन्यात यु मुंबाला पराभूत करून संघ पुणे येथे पोहचला आहे. पुढील सामन्यासाठी दहा दिवस विश्रांती....
यु मुंबा करणार का पराभवाची परतफेड?
प्रो कबड्डी आज पुन्हा महाराष्ट्रीयन डर्बीचा थरार अनुभवणार आहे. आज प्रो कबड्डीमधील सर्वात लोकप्रिय यु मुंबा आणि यंदाचे विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असणारे पुणेरी पलटण भिडणार....
यू पी योद्धाजला मिळणार का घरच्या मैदानावरील पहिला विजय ?
आज प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाच्या २४व्या दिवशी ४३ वा सामना यू पी योद्धाज आणि तामिल थालयवाज यांच्यात होणार आहे. हे दोनीही संघ प्रो कबड्डीत नवीन....
प्रो कबड्डी: हरयाणा स्टीलर्स दबंग दिल्लीला कणभर सरस
प्रो कबड्डीमध्ये आज पहिला सामना ‘झोन ए’ मधील दबंग दिल्ली आणि हरयाणा स्टीलर्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघाने त्यांचे मागील सामने जिंकले आहेत. हरयाणा संघाने....
कबड्डीपटू जसवीर सिंग अर्जुन पुरस्काराने सन्मानित !
स्कॉर्पियन किकसाठी पूर्ण कबड्डी जगात प्रसिद्ध असलेल्या जसवीर सिंगला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०१४च्या आशिया खेळामध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या संघात जसवीर होता. त्याच्या....
संपूर्ण यादी: खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांची घोषणा
आज केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांची घोषणा केली. त्यात पॅरा ऍथलेट देवेंद्र झांझरिया आणि माजी हॉकी कर्णधार सरदार सिंग....





