येत्या ९ एप्रिल पासून आयपीएल स्पर्धेला प्रारंभ होत आहे. आयपीएल २०२१ स्पर्धा भारतातच होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून सराव करत आहे. या स्पर्धेचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे. तसेच गतवर्षी अंतिम फेरी गाठलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघासाठी एक आनंदाची बातमी आहे, यासोबतच एक वाईट बातमी देखील आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाने गतवर्षी उल्लेखनीय कामगिरी करत अंतिम फेरी गाठली होती. परंतु त्याला अंतिम सामना जिंकण्यात अपयश आले होते. गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघासाठी कागिसो रबाडाने सर्वाधिक ३० गडी बाद केले होते. तसेच एन्रिच नॉर्किएने देखील चांगली कामगिरी केली होती.
आता नव्या आयपीएल हंगामासाठीही रबाडा आणि नॉर्किए सज्ज झाले आहेत. कगिसो रबाडा आणि एन्रिच नॉर्किए या दोन्ही खेळाडूंनी पाकिस्तान संघाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यातून माघार घेत आयपीएल स्पर्धेसाठी ६ एप्रिलला भारतात हजेरी लावली आहे. परंतु, या दोन्ही खेळाडूंना सुरुवातीचा सामना खेळण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
कारण, नियमाप्रमाणे या दोघांनाही ७ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीला सामोरे जावे लागणार आहे. त्यातच दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना १० एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मुंबईत होणार आहे. त्यामुळे या सामन्यापर्यंत दोघांचाही क्वारंटाईन कालावधी पूर्ण होणार नसल्याने या दोघांनाही पहिल्या सामन्याला मुकावे लागणार आहे.
हे दोघेही भारतात आल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाने अधिकृतरित्या जाहीर केले की, ‘दिल्ली कॅपिटल्स संघाचे वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि एन्रिच नॉर्किए हे दोघेही हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. त्यांना कोरोना प्रोटोकॉलमुळे ७ दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे.’
यंदाच्या हंगामात श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वाह! क्रिकेटवरील चर्चेसाठी ‘द वॉल’ राहुल द्रविडला ‘या’ देशातून आले आमंत्रण
कर्णधार म्हणून धोनीच्या चेन्नईविरुद्ध पहिलाच सामना खेळण्याबद्दल रिषभ पंतने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
क्यूट व्हिडिओ! आयपीएलच्या तयारीसाठी जॉस बटलरची मदत करतेय त्याची दोन वर्षांची लाडकी लेक