---Advertisement---

आयसीसीने कागिसो रबाडाला सुनावली मोठी शिक्षा, जाणून घ्या कारण

On: शुक्रवार, जानेवारी 17, 2020 8:04 PM
---Advertisement---

26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड (South Africa vs England) संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिले 2 सामने पार पडले आहेत. आता पोर्ट एलिझाबेथ (Port Elizabeth) येथे तिसरा कसोटी (Third Test Match) सामना सुरु आहे. या मालिकेचा तिसरा कसोटी सामना सुरु असतानाच दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने (Kagiso Rabada) आयसीसीच्या आचार संहितेचा भंग केला आहे. त्यामुळे आयसीसीने रबाडावर 1 कसोटी सामन्यासाठी बंदी घातली आली आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यात रबाडाला आयसीसीच्या आचार संहितेच्या लेव्हल 1  भंग केल्यामुळे शिक्षा दिली आहे. आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.5 चे उल्लंघन केल्यामुळे दोषी ठरवण्यात आले आहे. हा कलम आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान फलंदाज बाद झाल्यानंतर चुकीचे शब्द, हावभाव किंवा वर्तवणुकीचा वापर करुन राग व्यक्त करण्याशी निगडीत आहे.

आयसीसीने त्याच्या खात्यात 1 डेमिरिट पाॅईंटचा समावेश केला आहे. तसेच सामना शुल्काच्या 15 टक्के दंड आकारण्यात आला आहे.

या कसोटी सामन्यात जो रूटला (Joe Root) बाद केल्यानंतर रबाडाने चूकीच्या प्रकारे हावभाव केल्यामुळे आयसीसीने रबाडाला शिक्षा सुनावली आहे.

रबाडाने आयसीसीच्या आचार संहितेचा चौथ्यांदा भंग केला आहे. त्यामुळे रबाडाच्या खात्यात 24 महिन्यांमध्ये 4 डेमिरिट पाॅइंट्सचा समावेश झाला आहे. त्याचमुळे त्याला बंदीला सामोरे जावे लागले आहे.

त्याने आपली चूक मान्य केली असून आयसीसीचे मॅच रेफ्री एलिट पॅनलचे सदस्य असलेले अँडी पायक्राॅफ्ट (Andy Pycroft) यांनी दिलेली शिक्षा स्विकारली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---