संयुक्त अरब अमिरातीत चालू असलेला आयपीएलचा तेरावा हंगाम मावळतीला आला असून आता केवळ अंतिम सामना उरला आहे. या हंगामातील क्वालिफायर २ सामन्यातील ‘जिंकू वा मरू’ची लढाई रविवारी (८ नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाली. अबु धाबीमध्ये झालेल्या या महत्त्वपूर्ण सामन्यात दिल्लीने १७ धावांनी बाजी मारली. शिखर धवनच्या जबरा फलंदाजी आणि कागिसो रबाडाच्या शानदार गोलंदाजीने दिल्लीचा विजय साकारला.
कागिसो रबाडाने घेतल्या सर्वाधिक विकेट्स
प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने हैदराबादपुढे १९० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघ २० षटकात केवळ १७२ धावा करु शकला. दरम्यान दिल्लीचा हुकमी गोलंदाज कागिसो रबाडाने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने या सामन्यात ४ षटके गोलंदाजी करत २९ धावांवर सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
यात हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरची सर्वात महत्त्वपूर्ण विकेट त्याने घेतली. सोबतच अब्दुल समद, राशिद खान आणि श्रीवत्स गोस्वामी यांनाही त्याने पव्हेलियनला पाठवले.
एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
यासह रबाडाने त्याच्या आयपीएल २०२०मधील २९ विकेट्स पूर्ण केल्या आहेत. या हंगामातील आतापर्यंतच्या १६ सामन्यात त्याने ही संख्या गाठली आहे. त्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे.
रबाडापूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा ड्वेन ब्रावो या विक्रमाच्या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याने २०१३ साली पूर्ण हंगामात सर्वाधिक ३२ विकेट्स घेतल्या होत्या, तर मुंबई इंडियन्सच्या लसिथ मलिंगाने २०११मध्ये आणि राजस्थान रॉयल्सच्या जेम्स फॉकनरने २०१३मध्ये प्रत्येकी २८ विकेट्स घेतल्या होत्या. ते या विक्रमाच्या यादीत संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. शिवाय मुंबईचा जसप्रीत बुमराह २७ विकेट्ससह चौथ्या स्थानावर आहे. त्याला अंतिम सामन्यात या यादीत मोठी उडी घेण्याची संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
व्वा रे गब्बर! हैदराबादच्या गोलंदाजांना दिवसा तारे दाखवत धवनकडून सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
विक्रमवीर शिखर धवनच्या पारड्यात नव्या ‘रेकॉर्डची’ भर; रोहित-डिविलियर्सलाही टाकले मागे
‘मसाला डोसा आणि मसाला ऑमलेट’, ‘या’ खेळाडूने सांगितले जबरा सिक्सर मारण्यामागचे रहस्य
ट्रेंडिंग लेख-
लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ