भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात रविवारी (22 सप्टेंबर) पार पडलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 9 विकेट्सने विजय मिळवला आणि 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला कागिसो रबाडाने 9 व्या षटकात 9 धावांवर बाद केले. त्यामुळे रबाडा हा विराटला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात (कसोटी, वनडे आणि टी20) बाद करणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला तर एकूण सहावा गोलंदाज ठरला.
याआधी विराटला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात पॅट कमिन्स, ग्रॅमी स्वान, स्टिव्हन फिन, मोईन अली आणि डॅरेन सॅमी या गोलंदाजांनी बाद केले आहे.
किंग कोहलीला कसोटी, वनडे आणि टी२०त बाद करणारे गोलंदाज
पॅट कमिन्स
ग्रॅमी स्वान
स्टिवन फिन
मोईन अली
डॅरेन सॅमी
कागिसो रबाडा#म #मराठी #Marathi @Mazi_Marathi @MarathiRT— Sharad Bodage (@SharadBodage) September 23, 2019
रविवारी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 134 धावा केल्या होत्या.
भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. तसेच रिषभ पंत आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 19 धावा आणि हार्दिक पंड्याने 14 धावा केल्या. या चौघां व्यतिरिक्त भारताकडून एकालाही या सामन्यात दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही.
दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच बीजॉर्न फॉर्च्यून आणि ब्यूरान हेन्ड्रिक्सने प्रत्येकी 2 विकेट्स तर ताब्राईज शम्सीने 1 विकेट घेतली.
त्यानंतर 135 धावांच्या आव्हानाचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने 16.5 षटकात 1 विकेटच्या मोबदल्यात सहज पार केला. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार क्विंटॉन डीकॉकने नाबाद 79 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला रिझा हेन्ड्रिक्सने 28 आणि तेंबा बाउमाने नाबाद 27 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. भारताकडून हार्दिक पंड्याने एकमेव विकेट घेतली.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–वाढदिवस विशेष- माहित नसलेला अंबाती रायडू
–एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात वाईट बातमी…
–रिषभ पंत-श्रेयस अय्यरमध्ये घडलेल्या या गोंधळामागील विराट कोहलीने स्पष्ट केले कारण