दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC फायनल) अंतिम फेरीत पोहोचले आहेत. जून महिन्यात दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, ऑस्ट्रेलियाला हरवणे ही मोठी गोष्ट नाही.
पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या 10 विकेटने विजय मिळविल्यानंतर रबाडा मीडियाशी बोलताना म्हणाला, “अजूनही बराच वेळ शिल्लक आहे, परंतु वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसारखी मोठी संधी तुम्हाला त्यासाठी तयार करते.” दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नेहमीच कडवी टक्कर राहिली आहे. कारण आपण आव्हानातम्क क्रिकेट खेळतो. आम्ही शेवट पर्यंत झुंज देऊ. आम्हाला माहित आहे की ते आमच्यासमोर खडतर आव्हान उभे करतील. त्यांचा पराभव कसा करायचा हे आम्हाला माहीत आहे. यात फार मोठे काही नाही.”
विद्यमान चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने सिडनी येथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत भारतावर सहा गडी राखून विजय मिळवून WTC अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आणि मालिका 3-1 अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेने याआधीच अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. त्यांनी अलीकडेच कसोटी मालिकेत पाकिस्तानचा 2-0 असा पराभव केला.
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघावर चोकर्सचा टॅग लावण्यात आला आहे, जो प्रत्येक वेळी काढण्यात अपयशी ठरला आहे. मोठ्या स्पर्धांच्या बाद फेरीत लागोपाठच्या पराभवांमुळे या संघाला चोकर म्हटले जाऊ लागले आहे. 2024 च्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत त्यांना भारताकडून पराभव स्वीकारावा लागला होता. याआधीही दक्षिण आफ्रिका अनेकवेळा आयसीसी ट्रॉफी फायनलमध्ये पराभूत झाले आहे. त्यांना आता चोकर्सचा टॅग काढण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.
हेही वाचा-
6 महिन्यांत 13 लाजिरवाणे विक्रम, गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाची अवस्था बिकट
हे 3 प्रमुख भारतीय खेळाडू पहिल्यांदाच खेळणार इंग्लंडविरूद्ध टी20 सामना
रोहित-विराट अजून किती दिवस खेळणार? माजी दिग्गजाची प्रतिक्रिया