रबाडा 1 मे ला झालेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात पाठीच्या दुखापतीमुळे खेळला नव्हता. त्यामुळे 30 मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषकाचा विचार करता सावधगिरी बाळगण्यासाठी दक्षिण आफ्रीका क्रिकेट बोर्डाने त्याला बोलावून घेतले आहे.
रबाडा हा दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषकासाठी महत्त्वाचा गोलंदाज आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
रबाडाबद्दल दिल्ली कॅपिटल्सने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ‘रबाडाच्या दुखापतीवर चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचे रिपोर्ट्स विश्लेषणासाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाकडेही सोपवण्यात आले आहेत. त्यांच्या बोर्डाने त्याला बोलावून घेण्याचा आणि त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाचा सन्मान करतो.’
23 वर्षीय रबाडाने या आयपीएलच्या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. तसेच तो आत्तापर्यंतचा आयपीएल 2019 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही आहे. त्याने 12 सामन्यात 25 विकेट्स घेतल्या आहेत.
पण आता रबाडाला मायदेशी परतावे लागणार असल्याने त्याला आयपीएल प्लेऑफला तसेच साखळी फेरीत दिल्लीच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या शेवटच्या सामन्यालाही मुकावे लागणार आहे. दिल्ली साखळीफेरीतील शेवटचा सामना घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळणार आहे.
मायदेशी जाण्यापूर्वी रबाडा म्हणाला, ‘दिल्ली कॅपिटल्सला स्पर्धेच्या या स्तरावर आल्यानंतर सोडून जाणे अवघड आहे. पण विश्वचषकासाठी फक्त 1 महिना राहिला आहे आणि जो निर्णय घेण्यात आला आहे तो माझ्यासाठी आहे. दिल्ली कॅपिटल्सबरोबर मैदानात आणि मैदानाबाहेर आयपीएलचा हा मोसम माझ्यासाठी चांगला ठरला आहे. मला विश्वास आहे की आपला संघ नक्की विजेतेपद मिळवेल.’
दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज मागील काही काळापासून दुखापतीचा सामना करत आहे. त्यांचा डेल स्टेन हा अनुभवी वेगवान गोलंदाजही 2 आयपीएल सामने खेळल्यानंतर दुखापतीचा सामना करत आहे.
त्याचबरोबर लूंगी एन्गिडी हा देखील दुखापतीमुळे आयपीएलमध्ये सामील झालेला नाही आणि एन्रीच नोर्जे हा देखील खांद्याच्या दुखापतीचा सामना करत आहे. त्यामुळे विश्वचषकापूर्वी हे गोलंदाज पूर्ण फिट होण्याची दक्षिण आफ्रिकेला आशा असेल.
दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषक 2019 मधील पहिला सामना यजमान इंग्लंड विरुद्ध 30 मे ला होणार आहे.
🚨 ANNOUNCEMENT 🚨@KagisoRabada25 to miss the rest of our season after being recalled by Cricket SA for precautionary reasons ahead of the World Cup.#ThankYouKagiso #ThisIsNewDelhi #DelhiCapitals pic.twitter.com/eUARj0i2Mv
— Delhi Capitals (@DelhiCapitals) May 3, 2019
महत्त्वाच्या बातम्या –
–आयपीएलमध्ये ‘नो बॉल’ वादात चर्चेत आलेल्या या भारतीय पंचांना आयसीसीकडून मोठा धक्का
–धोनीने मारला एका हाताने षटकार, गोलंदाजाने बिमर टाकल्याने मागितली माफी, पहा व्हिडिओ
–काॅईन जमीनीवर फिरतोय, तरीही सीएसकेने टाॅस जिंकल्याचे रेफ्रीने केले जाहीर, पहा व्हिडिओ