उमेश यादव भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने भारतासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. पण सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेसाठी उमेशला संधी मिळाली नाही. संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांना मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांसाठीही त्याला संघात घेतले नाहीये. अशात वेगवान गोलंदाजांने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली.
36 वर्षीय उमेश यादव (Umesh Yadav) याने आपला शेवटचा कसोटी सामना मागच्या वर्षी जून महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. उमेशला या सामन्यात दोन विकेट्सवर समाधान मानावे लागले. पण त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो सातत्याने चांगले प्रदर्शन करत आहे. उमेशेने 2024 वर्ष सुरू झाल्यापासून शेवटच्या तीन प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये विदर्भ संघासाठी 18 विकेट्स नावावर केल्या आहेत. तसे पाहिले तर उमेश भारतीय खेळापट्टीवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये नेहमीच प्रभावी ठरली आहे. पण तरीदेखील मायदेशात इंग्लंडविरुद्ध यावर्षी कसोटी मालिका त्याला खेळता आली नाही.
संघ व्यवस्थापन आणि निडकर्त्यांनी आपल्यालाल डावल्याने वेगवान गोलंदाजा नाराज दिसत आहे. त्याने अधिकृत इंस्टाग्राम खात्यावर एक पोस्ट स्टोरी शेअर करत ही नाराजी व्यक्त केली. त्याने स्टोरीला लिहिले की, “पुस्तकावर धूळ जमल्यामुळे कथा संपत नाहीत.” त्याच्या स्टोरीचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते यावर वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहेत.
Umesh Yadav’s Instagram story. pic.twitter.com/sdP8n3QAko
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 10, 2024
दरम्यान, सध्या भारतीय संघात मुकेश कुमार देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळतो. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान दिले गेले होते. पण मुकेश या संधीचे सोने करू शकला नाही. इंग्लंडचे फलंदाज मुकेशविरोधात सहज धावा करताना दिसत होते. अशात सेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी उमेशला संधी मिळण्याची शक्यता होती. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी संघ व्यवस्थापनाने युवा आकाश दीप याला संघात घेतले.
बुमराहला विश्रांती देण्याची जोखीम संघ घेणार?
भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यालाही तिसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती मिळणार, अशा चर्चा सुरू होत्या. प्रत्यक्षात कर्णधार रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविड तिसऱ्या कसोटीत बुमराहला न खेळवण्याची जोखीम घेतील, असे दिसत नाही. भारताला मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी पुढचा प्रत्येक सामना जिंकणे गरजेचे आहे. (Kahani Abhi Baqi Hai! Umesh Yadav has not given up hope of playing Tests, Insta story in discussion)
महत्वाच्या बातम्या –
Rajkot Test । पुजारा संघाला घरी बोलावणार? अश्विनने बोलून दाखवली मनातील इच्छा
Gautam Gambhir : गौतम गंभीरवर कोसळला दुःखाचा डोंगर, कुटुंबातील सदस्याचे झाले निधन…